काँग्रेस मांडणार मुस्लिम आरक्षणाचा मुद्दा, सेनेच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष

काँग्रेस मांडणार मुस्लिम आरक्षणाचा मुद्दा, सेनेच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष

मुंबई काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक मंगळवारी पार पडली. या बैठकीत काँग्रेस पक्षाच्या वतीने काही ठराव मंजूर करण्यात आले.

  • Share this:

मुंबई, 24 फेब्रुवारी : काँग्रेस राष्ट्रवादी (NCP), काँग्रेस (Congress) आणि शिवसेना (Shivsena) या महाविकास आघाडी सरकारचा (MVA Goverment) कॉमन मिनिमम कार्यक्रमामध्ये मुस्लिम आरक्षण ही भूमिका आहे, असे वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे. येत्या अधिवेशनात मराठा आरक्षणाबरोबर मुस्लिम आरक्षण (Muslim reservation) ही भूमिका काँग्रेस पक्ष आग्रहाने मांडणार आहे. तसंच मुस्लिम आरक्षण या भूमिकेवर काँग्रेस मंत्रिमंडळ बैठकीत देखील आग्रही भूमिका मांडली, असे मत नाना पटोले यांनी व्यक्त केले आहे. मुस्लिम आरक्षणाबाबत आता शिवसेनेची नेमकी भूमिका काय असणार हे पाहण्याचे ठरणार आहे.

मुंबई काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक मंगळवारी पार पडली. या बैठकीत काँग्रेस पक्षाच्या वतीने काही ठराव मंजूर करण्यात आले. हिंदू सरकारने मंजूर केलेला कृषी आणि कामगार विरोधी कायदा याबाबत राज्यात अंमलबजावणी न करणे तसंच मराठा, मुस्लिम आरक्षण ही भूमिका आग्रही पद्धतीने मांडणे, राज्यात ओबीसी, आदिवासी यांच्यासाठी वेगवेगळ्या विकास योजनांसाठी आग्रही भूमिका पक्षाने घेत राहणे असे काही ठराव या बैठकीत मंजूर करण्यात आले.

महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश प्रभारी एच के पाटील, माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, काँग्रेसचे गटनेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माणिकराव ठाकरे यासह काँग्रेसचे प्रमुख नेते मंत्री राज्यमंत्री आजच्या या बैठकीला उपस्थित होते. काँग्रेस पक्षाने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका त्या अनुषंगाने पक्षाची तयारी यावर देखील चर्चा केली.

स्थानिक पातळीवर आघाडी करायची का नाही याचा निर्णय घेतला जाईल, असंही पटोले यांनी सांगितले. काँग्रेस पक्ष भविष्यात केंद्र सरकारने केलेल्या कृषी कायद्याच्या विरोधात आक्रमक पद्धतीने विरोध करेल. राज्यात या कायद्याची अंमलबजावणी केली जाणार नाही तसंच काँग्रेस पक्षाच्या वतीने संकल्प अभियान पुढील सहा महिने राबवण्यात येणार आहे. या अभियानाच्या माध्यमातून शेतकरी यांच्याशी संवाद केला जाईल. एक दिवस काँग्रेसचे नेते शेतकरी यांच्या समवेत राहतील, अशी माहिती काँग्रेस महाराष्ट्र प्रभारी पाटील यांनी दिली.

काँग्रेस पक्षाने मुस्लिम आरक्षणाची भूमिका आग्रही पद्धतीने मांडल्याने पुढील काळात महाविकास आघाडीत या मुद्द्यावरून विवाह होणार का याकडे आता लक्ष आहे.

Published by: sachin Salve
First published: February 24, 2021, 9:17 AM IST

ताज्या बातम्या