VIDEO: CM उद्धव ठाकरेंची डोकेदुखी वाढणार, ज्येष्ठ मंत्री थोरातांनी दिले नाराजीचे संकेत

VIDEO: CM उद्धव ठाकरेंची डोकेदुखी वाढणार, ज्येष्ठ मंत्री थोरातांनी दिले नाराजीचे संकेत

पृथ्विराज चव्हाण, राहुल गांधी आणि आता बाळासाहेब थोरात या तीन दिग्गज नेत्यांना गेल्या काही दिवसांमध्ये ठाकरे सरकारविषयी नाराजीचा सूर लावल्याने सरकारवर संशयाचे ठग निर्माण झाले आहेत.

  • Share this:

मुंबई 11 जून:  महाराष्ट्रात कोरोनासोबत सरकारची निकराची लढाई सुरू आहे. राज्यात अशी गंभीर परिस्थिती असताना सत्तेतल्या महाविकास आघाडीत सर्वच काही आलबेल नाही हे आता स्पष्ट होतंय. सत्तेत असतानाही आमचे काही प्रश्न आहेत आणि ते आम्ही मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या कानावर घातले आहेत अशी एक प्रकारची नाराजीच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि ज्येष्ठ मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली आहे.  सत्तेत असतानाही आमचे काही प्रश्न आहेत असं त्यांचं वक्तव्य हे नाराजीचे स्पष्ट संकेत देणारे आहेत असं म्हटलं जात आहे.

सरकारमध्ये असुनही काँग्रेसला विचारात घेतलं जात नाही, काँग्रेस नाराज आहे का? असा थेट प्रश्न थोरातांना पत्रकारांनी विचारला होता. त्यावर उत्तर देताना ते म्हणाले, सहाजिकच आहे आमचेही काही प्रश्न आहेत. अपेक्षा आहेत. त्यावर काम व्हावं असं आम्हाला वाटतं. आमच्या जेव्हा एकत्र बैठका होतात त्यात आम्ही आमच्या भावना व्यक्त करतो असं सांगत त्यांनी नाराजीचा सूर लावला.

सरकारमध्ये असतानाही ज्या अर्थी थोरात हे आमचेही काही प्रश्न आहेत असे म्हणतात, त्यावरून काँग्रेसचं मत फारसं विचारात घेतलं जात नाही असाच त्याचा अर्थ निघत असल्याचं असल्याचं मत राजकीय निरीक्षकांनी व्यक्त केलं आहे.

खरं आहे की खोटं: 15 जूननंतर देशभरात पुन्हा लागू होणार कडक लॉकडाऊन?

सत्ता स्थापनेपासूनच काँग्रेसमध्ये अशा प्रकारची भावना होती असं बोललं जातं आहे. नुकत्याच झालेल्या विधान परिषद निवडणुकीतही काँग्रेसने एका जागेवरून ताणून धरलं होतं. नंतर तो प्रश्न सोडविण्यात आल होता.

राजस्थानमध्ये पुन्हा हाय व्होल्टेज राजकीय ड्रामा, काँग्रेसने केली ACBकडे तक्रार

त्यानंतर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनांही आम्ही सरकारमध्ये असलो तर निर्णय घेण्याचे अधिकार आम्हाला नाहीत असं म्हटलं होतं. तर त्याही आधी माजी मुख्यमंत्री पृथ्विराज चव्हाण यांनीही नाराजी बोलून दाखवली होती. राज्यात आम्ही सत्तेत असलो तरी हे काँग्रेसचं नाही तर शिवसेनेचं सरकार आहे असं चव्हाण एका कार्यकर्त्याशी बोलताना म्हणाले होते.

या सर्व नेत्यांच्या वक्तव्यामुळेच काँग्रेस महाविकास आघाडीत नाराज असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समस्या वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

संपादन - अजय कौटिकवार

First published: June 11, 2020, 3:52 PM IST

ताज्या बातम्या