Home /News /national /

राजस्थानमध्ये पुन्हा हाय व्होल्टेज राजकीय ड्रामा, काँग्रेसने केली थेट ACBकडे तक्रार

राजस्थानमध्ये पुन्हा हाय व्होल्टेज राजकीय ड्रामा, काँग्रेसने केली थेट ACBकडे तक्रार

राफेल विमानबाबत काँग्रेसने मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. काँग्रेसमे ट्विट करीत एक व्हिडीओ शेअर केला आहे. या ट्विटमध्ये म्हटले आहे की – राफेलच्या आगमनावर वायूसेनेला शुभेच्छा देत तुम्ही भाजप सरकारच्या गोंधळावर प्रश्न उपस्थित करत असाल तर समजा अजूनही तुमच्यात देशभक्ती जिवंत आहे..जय हिंद

राफेल विमानबाबत काँग्रेसने मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. काँग्रेसमे ट्विट करीत एक व्हिडीओ शेअर केला आहे. या ट्विटमध्ये म्हटले आहे की – राफेलच्या आगमनावर वायूसेनेला शुभेच्छा देत तुम्ही भाजप सरकारच्या गोंधळावर प्रश्न उपस्थित करत असाल तर समजा अजूनही तुमच्यात देशभक्ती जिवंत आहे..जय हिंद

राज्यसभा निवडणुकीच्या आधी काँग्रेस चांगलीच सावध झाली असून काँग्रेसने आपले आमदार हॉटेलमध्ये हलवण्यास सुरुवात केली असल्याची माहिती आहे.

    जयपूर, 11 जून : राज्यसभा निवडणुकीच्या (Rajyasabha Election 2020) पार्श्वभूमीवर राजस्थानमध्ये पुन्हा एकदा राजकीय नाट्याला सुरुवात झाली आहे. सरकार अस्थिर करण्यासाठी आमच्या आमदारांना भाजपकडून पैशाचं आमिष दाखवलं जात असल्याचा घणाघाती आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे. तसंच काँग्रेसकडून या पार्श्वभूमीवर थेट ACBकडे तक्रार करण्यात आली आहे. 'काँग्रेस आणि अपक्ष आमदारांना जाळ्यात ओढण्यासाठी पैशाचं आमिष दाखवलं जात आहे. हे प्रयत्न लोकशाही प्रक्रियेच्या विरोधात आहेत. तसंच हा एक गुन्हादेखील आहे. त्यामुळे अशा लोकांवर कठोर कारवाई होण्याची गरज आहे,' असं काँग्रेसने आपल्या तक्रारीत म्हटलं आहे. राज्यसभा निवडणुकीच्या आधी काँग्रेस चांगलीच सावध झाली असून काँग्रेसने आपले आमदार हॉटेलमध्ये हलवण्यास सुरुवात केली असल्याची माहिती आहे. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी काँग्रेस आणि अपक्ष आमदारांची बुधवारी एक बैठकही बोलावण्यात आली होती. त्यानंतर आमदारांना हॉटेलमध्ये नेण्यास सुरुवात झाली. राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपकडून मोठी ताकद लावण्यात येणार आहे, हे तर स्पष्टच आहे. त्यामुळे राजस्थानमध्ये सत्तेत असणारी काँग्रेस कोणतीच जोखीम पत्करणार नसल्याचं दिसत आहे. राजस्थानमध्ये 3 जागांसाठी होणार मतदान राजस्थानमध्ये राज्यसभेच्या तीन जागांसाठी 19 जून रोजी मतदान होणार आङे. काँग्रेस आणि भाजपचे प्रत्येकी दोन उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. त्यामुळे मतदानाची तारीख जवळ येताच राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. जास्तीत जास्त जाग जिंकण्यासाठी काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांना जोर लावला आहे. त्यामुळे या निवडणुकीत कोण बाजी मारणार, हे पाहाणं औत्सुक्याचं ठरणार आहे. संपादन - अक्षय शितोळे
    Published by:Akshay Shitole
    First published:

    Tags: Congress, Rajasthan

    पुढील बातम्या