मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

अरे देवा! ब्लॅक, व्हाइट, येलो आणि आता Cream Fungus; कोरोनाव्हायरसनंतर बुरशीचं थैमान

अरे देवा! ब्लॅक, व्हाइट, येलो आणि आता Cream Fungus; कोरोनाव्हायरसनंतर बुरशीचं थैमान

ज्याप्रमाणे कोरोनाची वेगवेगळी रूपं समोर आली, तशी आता फंगसचीही (Fungus) वेगवेगळी रूपं समोर येत आहेत.

ज्याप्रमाणे कोरोनाची वेगवेगळी रूपं समोर आली, तशी आता फंगसचीही (Fungus) वेगवेगळी रूपं समोर येत आहेत.

ज्याप्रमाणे कोरोनाची वेगवेगळी रूपं समोर आली, तशी आता फंगसचीही (Fungus) वेगवेगळी रूपं समोर येत आहेत.

  • Published by:  Priya Lad

प्रतीक अवस्थी/भोपाळ, 27 मे : कोरोना महासाथीच्या लाटा, कोरोनाव्हायरसची वेगवेगळी रूपं आणि आता नवनव्या फंगसचंही (Fungus)  थैमान. कोरोनाच्या संकटात फंगसचं नवं संकटही ओढावलं आहे. ज्याप्रमाणे कोरोनाची वेगवेगळी रूपं समोर आली, तशी आता फंगसचीही वेगवेगळी रूपं समोर येत आहेत. ब्लॅक (Black Fungus), व्हाइट (White Fungus), येलो फंगसनंतर (Yellow Fungus) आता क्रिम फंगसही (Cream Fungus) दिसून आलं आहे. मध्य प्रदेशच्या क्रिम फंगसचा (Madhya pradesh cream fungus) रुग्ण आढळला आहे.

मध्य प्रदेशच्या (Madhya pradesh) जबलपरूमध्ये एका रुग्णाला ब्लॅक फंगससह क्रिम फंगसचं इन्फेक्शन झालं आहे. माहितीनुसार राज्यातील हे असं पहिलं प्रकरण आहे.  सुभाषचंद्र बोस मेडिकल कॉलेजच्या ईएनटी विभागात या रुग्णावर उपचार सुरू आहेत.

हे वाचा - White fungus ने रुग्णाची आतडीच पोखरून काढली; पहिलंच भयंकर प्रकरण समोर

बुरशी म्हणजे परजीवी वनस्पतीचे छोटे छोटे रोपटं. ते क्लोरोफिल होत नाही, त्यामुळे ते गोठतात किंवा विकसित होतात. मात्र त्यांनी मानवी शरीरात प्रवेश केल्यास ते गंभीर नुकसान करतात. जगभरात विविध प्रकारचे फंगस आढळतात. ते आपल्या शरीरात शिरून नुकसान करू शकतात. इम्युनिटीदेखील कमजोर करतात. काही फंगस तर इतके गंभीर आजारी करू शकतात की त्यावर उपचार होणंही कठीण असतं.

हे वाचा - हैराण करणारा प्रकार; आईचा रिपोर्ट निगेटिव्ह, मात्र जन्मजात मुलीचा पॉझिटिव्ह

प्रामुख्याने हवा, पाणी, हवेतील प्रदूषण, माती, भाजी, खतं, रोपं आणि फळं हे बुरशीचे सुवाहक आहेत. या माध्यमातून बुरशी आपल्या मानवी शरीरात प्रवेश करते. असं म्हणतात, म्युकोरमायकोसिस ही बुरशी आपल्या नाकात आणि घशात कायम असते. मात्र ती शरीराच्या आत गेली आणि पसरली तर जीवघेणी ठरू शकते. ही बुरशी आपल्या शरीरातील अनेक अवयवांचे कायमस्वरुपी नुकसान करू शकते.

First published:

Tags: Corona, Coronavirus