मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /माजी राज्यमंत्री कृपाशंकर सिंग यांचा भाजपमध्ये प्रवेश

माजी राज्यमंत्री कृपाशंकर सिंग यांचा भाजपमध्ये प्रवेश

काँग्रेसमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून अडगळीत पडलेले कृपा शंकर सिंग यांनी भाजपची वाट निवडली होती

काँग्रेसमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून अडगळीत पडलेले कृपा शंकर सिंग यांनी भाजपची वाट निवडली होती

काँग्रेसमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून अडगळीत पडलेले कृपा शंकर सिंग यांनी भाजपची वाट निवडली होती

मुंबई, 07 जुलै: काँग्रेसचे मुंबईचे माजी शहरअध्यक्ष आणि माजी राज्यमंत्री कृपाशंकर सिंग यांनी अखेर भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत कृपा शंकर सिंग यांना पक्षात प्रवेश देण्यात आला आहे. '370 कलमाच्या जनजागृतीसाठी काम केले म्हणून त्यांना प्रवेश दिला' असंही फडणवीस यांनी सांगितलं.

काँग्रेसमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून अडगळीत पडलेले कृपा शंकर सिंग यांनी भाजपची वाट निवडली होती. अखेर आज देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत प्रवेश देण्यात आला आहे. यावेळी यतीन कदम यांनीही प्रवेश केला.

'आपल्यासाठी आनंदाची बाब की ताकद असलेले लोक प्रवेश करतात. मी त्यावेळी म्हणालो होतो की मोठी संधी आहे. जिथे लोक भाजपच्या विरोधात एकवटले तिथे भाजप वाढतो. त्यामुळे १-२ टर्म सत्ता नसेल तर आम्ही विचार करत बसत नाही. ज्यावेळी ३७० कलमाचा विषय आला त्यावेळी त्यांच्यातील राष्ट्रवाद जागं झालं तेंव्हा त्यांना वाटले की भारताला एक संघ बनवण्यासाठी मोदी हे प्रयत्न करत असेल तर मदत केली पाहिजे. त्यांनी २१ महिने झाले काँग्रेस सोडून ते मधल्या काळात ३७० कलम बद्दल जनगागृती करत होते, असंही यावेळी फडणवीस म्हणाले.

IND vs ENG : टीम इंडियातील गोंधळावर BCCI नाराज, विराटलाही विचारला प्रश्न

तर,  'देवेंद्र फडणवीस यांनी मला कधी अडचणीत आणले नाही. मंत्री असताना ते प्रश्न विचारायचे. मी सांगायचो की नंतर उत्तर देतो ते मान्य करायचे. मी ठरवले की जर मला राजकारण करायचे असेल तर ते भाजपमध्येच करेन. तुम्ही माझ्यावर एकदा विश्वास दाखवा मी तो पूर्ण करेन, असं यावेळी कृपाशंकर सिंग म्हणाले.

मोठी बातमी! भाजपचे निलंबित आमदार एकवटले; कारवाईविरोधात कोर्टात जाण्याची शक्यता

खरंतर गेल्या काही वर्षांपासून राजकारणाच्या मुख्य प्रवाहात येण्याचा कृपाशंकर सिंग यांचा प्रयत्न होता. मात्र त्या प्रयत्नांना त्यांना वेळोवेळी निराशा आली. ते गेल्या काही वर्षांपासून  भारतीय जनता पक्षात प्रवेश करतील, अशी चर्चा कायम होती. काही दिवसांपूर्वी त्यांनी सिंधुदूर्गात जाऊन भाजपचे खासदार नारायण राणे यांच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली आणि मुंबईत ते करू पाहत असलेल्या उत्तर भारतीयांच्या एक लाखांच्या मेळाव्याला अमित शहा यांनी यावं, असं त्यांनी निमंत्रण देखील दिले होतं. अखेर या भेटीतून कृपाशंकर सिंग यांच्या भाजप प्रवेशाचा मार्ग निघाला आहे.

First published:
top videos

    Tags: Maharashtra, Mumbai