मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IND vs ENG : टीम इंडियातील गोंधळावर BCCI नाराज, विराटलाही विचारला प्रश्न

IND vs ENG : टीम इंडियातील गोंधळावर BCCI नाराज, विराटलाही विचारला प्रश्न

इंग्लंड दौऱ्यावर गेलेल्या टीम इंडियामध्ये (Team India) शुभमन गिल (Shubman Gill) जखमी झाल्यानं गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. या गोंधळावर BCCI नाराज आहे.

इंग्लंड दौऱ्यावर गेलेल्या टीम इंडियामध्ये (Team India) शुभमन गिल (Shubman Gill) जखमी झाल्यानं गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. या गोंधळावर BCCI नाराज आहे.

इंग्लंड दौऱ्यावर गेलेल्या टीम इंडियामध्ये (Team India) शुभमन गिल (Shubman Gill) जखमी झाल्यानं गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. या गोंधळावर BCCI नाराज आहे.

मुंबई, 7 जुलै: इंग्लंड दौऱ्यावर गेलेल्या टीम इंडियामध्ये (Team India) शुभमन गिल (Shubman Gill) जखमी झाल्यानं गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. शुभमन गिलचा बदली खेळाडू म्हणून कोण येणार याबाबत अनेक चर्चा सुरू आहेत. त्या जागेवर पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) आणि देवदत्त पडिक्कल (Devdutt Paddikal) या दोघांपैकी किमान एकाचा समावेश करण्याची टीम मॅनेजमेंटची मागणी आहे. हे दोघंही सध्या श्रीलंकेत आगामी सीरिजची तयारी करत आहेत. टीम इंडियाच्या मॅनेजरने अधिकृतपणे शुभमन गिलच्या जागी बदली खेळाडू देण्याची मागणी बीसीसीआयकडं केली होती, ती मागणी फेटाळण्यात आली आहे.

बीसीसीआयच्या अधिकाऱ्यानं या परिस्थितीनर नाराजी व्यक्त केली आहे. कॅप्टन विराट कोहलीच्या (Virat Kohli) समोर 24 सदस्यांच्या टीमची निवड झाली. त्यावेळी हा प्रश्न का उपस्थित केला नाही. या अधिकाऱ्यानं 'टाईम्स ऑफ इंडिया'ला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हंटले आहे की, 'टीम मॅनेजमेंटनं त्यांची भूमिका स्पष्ट करायल हवी. निवड समितीनं टीमची रचना करताना नेहमीच मॅनेजमेंटच्या मताला प्राधान्य दिले आहे. कॅप्टन विराट कोहलीच्या उपस्थितीमध्ये ही निवड झाली आहे. राहुलला ओपनिंग बॅट्समन म्हणून निवडण्यात आलंय. त्यांच्याकडे काही वेगळी योजना होती, तर त्यांनी त्याबाबत तसं स्पष्ट करायला हवे होते.'

अभिमन्यू इश्वरन बद्दल मॅनेजमेंटला खात्री का नााही, हे त्यांनी स्पष्ट करावे असंही या अधिकाऱ्यानं म्हंटलं आहे. निवड समितीच्या मतानुसार टीम इंडियाकडे अजूनही रोहित शर्मा, मयंक अग्रवाल, केएल राहुल आणि अभिमन्यू इश्वरन हे चार ओपनिंग बॅट्समन आहेत. अगदीच गरज पडली तर हनुमा विहारीचाही उपयोग करता येऊ शकतो. इंग्लंडचा दीर्घ दौरा लक्षात घेऊनच 24 सदस्यांची टीम पाठवण्यात आली आहे, तरीही टीम मॅनेजमेंटनं नव्या खेळाडूची मागणी केल्यानं निवड समितीनं नाराजी व्यक्त केली आहे.

Happy Birthday Dhoni: धोनीचे 7 नंबरशी काय आहे विशेष कनेक्शन, वाचा सविस्तर

चेतन शर्मांनी केलं दुर्लक्ष

शुभमन गिलची दुखापत माहिती असूनही चेतन शर्मा यांनी टीम प्रशासनाच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्याचं बोललं जात आहे. हे दोघं सध्या श्रीलंकेत आहेत आणि 26 जुलैला श्रीलंका सीरिज संपल्यानंतर ते इंग्लंडला जाऊ शकतात, पण टीमला त्याआधीच दोन्ही खेळाडू तिकडे हवे आहेत. चेतन शर्मा यांनी टीमच्या मागणीकडे आधीच लक्ष दिलं असतं, तर पृथ्वी शॉ आणि देवदत्त पडिक्कल सराव सामन्यासाठीच इंग्लंडला पोहोचले असते, असा दावाही सूत्रांनी केला आहे.

First published:
top videos

    Tags: BCCI, Cricket news, India vs england, Virat kohli