मुंबई, 13 जुलै : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (nana Patole) यांच्या विधानामुळे महाविकास आघाडीमध्ये (mva government) एकच गोंधळ उडाला होता. या वादानंतर आता काँग्रेसचे प्रभारी एच. के. पाटील, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात (balasaheb thorat) आणि अशोक चव्हाण (ashok chavan) हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) यांच्या भेटीला पोहोचले आहे.
राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण आणि काँग्रेसचे प्रभारी एच. के. पाटील यांनी शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक निवास्थानी जाऊन भेट घेतली. शरद पवार यांच्या भेटीला काँग्रेसचे प्रभारीपोहोचल्यामुळे राजकीय तर्कवितर्क लढवले जात आहे.
राज्याचे महसूल मंत्री ना. बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. अशोक चव्हाण आणि काँग्रेसचे प्रभारी एच. के. पाटील यांनी आज आदरणीय खा. शरद पवार साहेबांची त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली.@PawarSpeaks @bb_thorat @AshokChavanINC @HKPatil1953 pic.twitter.com/PuKQlmfvFZ
— NCP (@NCPspeaks) July 13, 2021
काँग्रेसच्या मेळाव्यात बोलत असताना नाना पटोले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आपल्यावर पाळत ठेवतात, असं विधान केलं होतं. त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पटोले यांच्या विधानावर तीव्र नाराजी व्यक्त केली होती. एवढंच नाहीतर अजित पवार यांनी सुद्धा नाना पटोले यांच्या विधानावर तीव्र नाराजी व्यक्त करत मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली होती. तसंच, काँग्रेसच्या नेत्यांसोबत याबद्दल बोलणार असल्याचं सांगितलं होतं.
कमाई करण्याची खास संधी देतेय RBI! या स्कीममध्ये खातं उघडा,पैसेही राहतील सुरक्षित
त्यानंतर आज काँग्रेसचे तिन्ही नेते शरद पवार यांच्या भेटीला पोहोचले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये निर्माण झालेल्या कुरबुरीवर पवारांच्या दरबारी तोडगा निघण्याची शक्यता आहे.
माझ्या विधानाचा विपर्यास केला - नाना पटोले
दरम्यान, 'केंद्रीय व्यवस्था प्रसारमाध्यमांवर दबाव आणत आहे. केंद्रातील सरकार सगळ्यांवर दबाव ठेवत आहे. येथ ही आयबी इतर व्यवस्था लोक असतील, पण माझ्या वक्तव्य मात्र वेगळ्या स्वरुपात दाखवले. पक्ष आणि सरकार वेगळे आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भूमिका पक्षप्रमुख आणि सरकार म्हणून वक्तव्य वेगळे असतात. काँग्रेस प्रदेश म्हणून मी काम करतो, सरकार आणि पक्ष फरक असतो. पवार आणि ठाकरे यांचे वक्तव्य वेगळा अर्थ काढला जात नाही पण माझ्या वक्तव्य वेगळा अर्थ का काढला जातो माहिती नाही', असंही पटोले म्हणाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Balasaheb thorat, Sharad pawar