Home /News /mumbai /

सहकार क्षेत्रातील निवडणुकीचा मार्ग मोकळा, ठाकरे सरकारकडून ग्रीन सिग्नल

सहकार क्षेत्रातील निवडणुकीचा मार्ग मोकळा, ठाकरे सरकारकडून ग्रीन सिग्नल

 
राज्यात आता 65 हजार सहकारी संस्था आहेत, त्यात या काळात सर्वाधिक निवडणूक हाऊसिंग सोसायटीच्या निवडणूक होतील.

राज्यात आता 65 हजार सहकारी संस्था आहेत, त्यात या काळात सर्वाधिक निवडणूक हाऊसिंग सोसायटीच्या निवडणूक होतील.

राज्यात आता 65 हजार सहकारी संस्था आहेत, त्यात या काळात सर्वाधिक निवडणूक हाऊसिंग सोसायटीच्या निवडणूक होतील.

मुंबई, 13 सप्टेंबर : राज्यात कोरोनाची लाट ओसरली असल्यामुळे निवडणुका (election) घेण्याची तयारी केली जात आहे. आता  राज्यातील सहकार क्षेत्रातील निवडणूक (Co-operative elections ) घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. महाविकास आघाडी सरकारच्या (mva government) झालेल्या बैठकीत सहकार क्षेत्रातील निवडणुकीला मुदतवाढ देण्यात आली नाही. त्यामुळे आता निवडणुका होणार आहे. कोरोनाच्या परिस्थितीमुळे राज्यातील राज्यातील निवडणुकांचा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला होता. पण आता कोरोनाची लाट ओसरल्यामुळे निवडणुका घेण्याची तयारी सुरू केली आहे.  कोरोनाच्या कारणास्तव  सहकारी संस्थांच्या निवडणुकांना 31 ऑगस्ट स्थगिती देण्यात आली होती. ही मुदत संपल्याने सहकार विभागाने आज झालेल्या बैठकीत  निवडणुकांना पुन्हा स्थगितीची मुदतवाढ दिली नाही. यामुळे आता सहकार विभागाच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. IND vs ENG : टीम इंडियाच्या इमानदारीवर प्रश्न, 'विराट कोहलीने अर्ध्या रात्रीच... राज्यात आता 65 हजार सहकारी संस्था आहेत, त्यात या काळात सर्वाधिक निवडणूक हाऊसिंग सोसायटीच्या निवडणूक होतील. तसंच कृषी उत्पन्न बाजार समित्या, दूध संघ समावेश असणार आहे. त्यामुळे जिल्हा पातळी आणि ग्रामीण भागात निवडणुकीची रणधुमाळी पाहण्यास मिळणार आहे. नातेही विसरला नराधम, 16 वर्षीय अपंग पुतणीवर काकाने केला बलात्कार, भिवंडीतील घटना दरम्यान, त्याआधी आज धुळे, नंदुरबार, अकोला, वाशीम व नागपूर जिल्हा परिषदा व त्यांतर्गतच्या पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांचा स्थगित केलेला निवडणूक कार्यक्रम पूर्ण करण्याच्या दृष्टीने 5 ऑक्टोबर 2021 रोजी मतदान घेण्यात येणार आहे, अशी घोषणा निवडणूक आयोगाकडून करण्यात आली आहे. तसंच पालघर जिल्हा परिषदेच्या व त्या अंतर्गतच्या रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी देखील त्याच दिवशी मतदान होईल आणि सर्व ठिकाणी 6 ऑक्टोबर 2021 रोजी मतमोजणी होणार आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुका जाहीर राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी निवडणुकीच्या कार्यक्रमाबद्दल घोषणा केली आहे. धुळे, नंदुरबार, अकोला, वाशीम आणि नागपूर या 5 जिल्हा परिषदा आणि त्यांतर्गतच्या पंचायत समित्यांमधील रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी 19 जुलै 2021 रोजी मतदान होणार होते; परंतु सर्वोच्च न्यायालयाचे 6 जुलै 2021 रोजीचे आदेश आणि राज्य शासनाने कोविड-19 मुळे पोटनिवडणुका स्थगित करण्याबाबत केलेली विनंती लक्षात घेऊन राज्य निवडणूक आयोगाने या निवडणुका 9 जुलै 2021 रोजी आहे. त्या टप्प्यावर स्थगित केल्या होत्या. या प्रकरणी 9 सप्टेंबर 2021 रोजी झालेल्या सुनावणीत मात्र सर्वोच्च न्यायालयाने राज्य शासनाचे 11 ऑगस्ट 2021 रोजीचे कोविड-19 संदर्भातील निर्बंध पोटनिवडणुकांसाठी लागू होत नसल्याचा निर्णय दिला आहे.
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या