Home /News /maharashtra /

नातेही विसरला नराधम, 16 वर्षीय अपंग पुतणीवर काकाने केला बलात्कार, भिवंडीतील घटना

नातेही विसरला नराधम, 16 वर्षीय अपंग पुतणीवर काकाने केला बलात्कार, भिवंडीतील घटना

 काही दिवसांपूर्वी नराधम काकाने अल्पवयीन पुतणीवर बळजबरीने बलात्कार केला. मात्र..

काही दिवसांपूर्वी नराधम काकाने अल्पवयीन पुतणीवर बळजबरीने बलात्कार केला. मात्र..

काही दिवसांपूर्वी नराधम काकाने अल्पवयीन पुतणीवर बळजबरीने बलात्कार केला. मात्र या घटनेमुळे अपंग असलेली पीडिता मानिसकदृष्ट्या दबावाखाली होती.

भिवंडी, 13 सप्टेंबर : मुंबईमध्ये साकिनाका बलात्कार (mumbai sakinaka case) आणि हत्या प्रकरण ताजे असताना मुंबई नजीक असलेल्या भिवंडीत (bhiwandi) नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. 16 वर्षीय अल्पवयीन पुतणीवर (disabled nephew ) 48 वर्षीय काकाने बलात्कार (rape) केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, पीडित अल्पवयीन मुलगी ही अपंग आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,काका पुतणीच्या नात्याला काळिमा फासल्याची घटना भिवंडी तालुक्यात घडली आहे. पीडित अल्पवयीन मुलगी ही अपंग असून तिच्या असह्यातेचा गैरफायदा घेऊन काकाने अत्याचार केला. याप्रकरणी भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात भादंविच्या कलम ३७६ सह पोक्सो कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करून पोलिसांनी नराम काकाला बेड्या ठोकल्या आहेत. ..आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे पोलिसांसमोर झाले हजर भिवंडी तालुक्यातील एका गावात पीडित अपंग अल्पवयीन मुलगी कुटुंबासह राहते. तर त्याच गावात नराधम काका ही राहतो. काही दिवसांपूर्वी नराधम काकाने अल्पवयीन पुतणीवर बळजबरीने बलात्कार केला. मात्र, या घटनेमुळे अपंग असलेली पीडिता मानिसकदृष्ट्या दबावाखाली होती. त्यामुळे घरच्यांनी तिच्याकडे रविवारी चौकशी केली असता,अत्याचाराची घटना समोर आली. त्यांनतर पीडितेच्या कुटुंबाने भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात धाव घेतली.त्यानंतर पीडित मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. पीडितेचा जबाब नोंदवल्यानंतर नराधम काकावर बलात्कारासह पोक्सो कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला.

T20 World Cup 2021 : धोनी भारताचा मेंटर, तर माहीचाच मित्र झाला पाकिस्तानचा कोच

त्यानंतर या नराधम काकाचा ठाणे जिल्हा ग्रामीण पोलिसांनी शोध सुरू केला असता,त्याला भिवंडी तालुक्यातील नाईकपाडा येथून अटक केल्याची माहिती पोलीस अधिकऱ्यांनी दिली आहे. या प्रकरणाची अधिक चौकशी पोलीस करीत असून आज आरोपीला न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.
Published by:sachin Salve
First published:

Tags: Bhiwandi, Rape

पुढील बातम्या