जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IND vs ENG : टीम इंडियाच्या इमानदारीवर प्रश्न, 'विराट कोहलीने अर्ध्या रात्रीच...'

IND vs ENG : टीम इंडियाच्या इमानदारीवर प्रश्न, 'विराट कोहलीने अर्ध्या रात्रीच...'

टीम इंडिया आणि विराटच्या इमानदारीवरच प्रश्नचिन्ह

टीम इंडिया आणि विराटच्या इमानदारीवरच प्रश्नचिन्ह

मॅनचेस्टर टेस्ट रद्द झाल्यानंतर (Manchester Test Cancel) इंग्लंड क्रिकेट बोर्ड (ECB) आणि त्यांचे माजी खेळाडू चांगलेच संतापले आहेत. इंग्लंडचे माजी कर्णधार डेव्हिड गोवर (David Gower) यांनी तर विराट कोहलीवरच (Virat Kohli) प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 13 सप्टेंबर : मॅनचेस्टर टेस्ट रद्द झाल्यानंतर (Manchester Test Cancel) इंग्लंड क्रिकेट बोर्ड (ECB) आणि त्यांचे माजी खेळाडू चांगलेच संतापले आहेत. इंग्लंडचे दिग्गज क्रिकेटपटू मीडियामध्ये भारतीय खेळाडूंच्या विरोधात बोलत आहेत. इंग्लंडचे माजी कर्णधार डेव्हिड गोवर (David Gower) यांनी तर विराट कोहलीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. डेव्हिड गोवर यांनी टीम इंडियाच्या इमानदारीवरच प्रश्न उपस्थित केले आहेत. आयपीएल 2021 (IPL 2021) साठी टीम इंडियाने पाचवी टेस्ट रद्द केली, असं गोवर म्हणाले. क्रिकेट डॉट कॉमशी बोलताना डेविड गोवर यांनी हे आरोप केले. मॅनचेस्टर टेस्ट पाहण्यासाठी आपणही तिकडे पोहोचलो होतो, पण अखेरच्या वेळी हा मुकाबला रद्द करण्यात आला. मॅचच्या आधीच्या रात्री विराट कोहलीने (Virat Kohli) बीसीसीआयला (BCCI) मेल केला. या प्रकरणात नेमकं काय झालं, ते समोर येणं गरजेचं आहे, असं वक्तव्य डेविड गोवर यांनी केलं. ‘आयपीएल एवढी जवळ होती की टेस्ट मॅच रद्द करावी लागली. माझ्यासाठी टेस्ट क्रिकेट सगळ्यात महत्त्वाचं आहे, असं विराट म्हणाला होता. आमच्या सगळ्यांसाठी टेस्ट क्रिकेट महत्त्वाचं आहे आणि मॅनचेस्टर टेस्ट रद्द होणं दुर्भाग्य आहे,’ अशी प्रतिक्रिया गोवर यांनी दिली. ‘येत्या दिवसांमध्ये अनेक गोष्टी समोर येतील, पण भारतीय खेळाडू लगेच आयपीएलसाठी युएईला रवाना झाले आणि तयारीही सुरू केली. आयपीएल आणि मॅनचेस्टर टेस्ट रद्द होण्याचा संबंध आहे,’ असा आरोप गोवर यांनी केला.

जाहिरात

याआधी इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन (Michael Vaughan) यानेही आयपीएलमुळे मॅनचेस्टर टेस्ट रद्द झाल्याचा आरोप केला होता. आयपीएल टीम खेळाडूंसाठी चार्टर प्लेन पाठवत आहेत. युएईमध्ये 6 दिवस क्वारंटाईन होणं गरजेचं आहे. 7 दिवसांनी आयपीएल सुरू होणार आहे. आयपीएलमुळे टेस्ट मॅच रद्द करण्यात आली नाही, हे कारण कोणीही मला सांगू नये, असं ट्वीट मायकल वॉनने केलं होतं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात