नवी दिल्ली, 14 ऑगस्ट : आयुष्यात एकदा तरी विमानप्रवास (Flight Travel) करावा, असं सर्वसामान्य माणसांचं स्वप्न असतं. काही लोक नोकरी, व्यवसायाच्या निमित्ताने सातत्याने विमान प्रवास करत असतात. सध्या कोरोनाच्या (Coronavirus impact on air travel) काळात विमान प्रवासावर अनेक निर्बंध आले आहेत. त्यामुळे विमान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे. लवकरच देशांतर्गत विमान प्रवास महागणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने (Civil Aviation Ministry) देशांतर्गत विमान प्रवास दरात (Domestic Air Fares) कमाल आणि किमान मर्यादेत 12.5 टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला असल्याचे, याबाबत माहिती असणाऱ्या अधिकाऱ्यांनी सांगितले. मंत्रालयाने प्रवास दरात 9.83 असलेली किमान आणि कमाल मर्यादा वाढवून ती 12.82 टक्के केली आहे. ही दरवाढ पाहता विमान प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या खिशाला कात्री लागणार हे निश्चित आहे.
सावध राहा! या लोकांना Delta plus चा सर्वाधिक धोका; राज्याने जारी केला रिपोर्ट
मागील वर्षी कोरोनामुळे लॉकडाउन लागू करण्यात आला होता. त्यानंतर सुमारे 2 महिना विमानसेवा बंद होती. त्यानंतर 25 मे 2020 रोजी दोन महिन्यांनंतर विमानसेवा सुरू करण्यात आली. त्या वेळी सरकारने देशांतर्गत विमान भाड्यावर किमान आणि कमाल मर्यादा लागू केली. सध्या कोरोना स्थिती काही प्रमाणात नियंत्रणात असल्याने एअरलाइन्स कंपन्या (Airlines Companies) पूर्ण क्षमतेने विमान प्रवासाचं नियोजन करत आहेत. नुकतीच सरकारने देशांतर्गत प्रवासासाठी विमान कंपन्यांना अधिक क्षमतेनं उड्डाणं करण्यास परवानगी दिली आहे. कारण ग्राहकांचा देशांतर्गत प्रवासासाठी विमान प्रवासाकडे कल वाढू लागला आहे. सद्यस्थितीत एअरलाइन्स कंपन्यांची उड्डाणक्षमता 65 टक्क्यांवरून वाढून 72.5 टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे.
तिकीट किती महागणार?
12 ऑगस्ट 2021 रोजीच्या एका आदेशानुसार, मंत्रालयाने 40 मिनिटं कालावधीच्या उड्डाणांसाठीच्या तिकीट दराची किमान मर्यादा (Lower Caps) 11.53 टक्क्यांनी वाढवून ती 2600 रुपयांवरून 2900 रुपये केली आहे. 40 मिनिटांपेक्षा कमी कालावधीच्या उड्डाणांसाठी तिकीटदराची कमाल मर्यादा (Upper Caps) 12.82 टक्क्यांनी वाढवून ती 8800 रुपये करण्यात आली आहे. याप्रमाणेच 40 ते 60 मिनिटांच्या कालावधीतल्या उड्डाणांसाठीच्या तिकीटदराची मर्यादा आता 3300 ऐवजी 3700 रुपये करण्यात आली आहे. या उड्डाणांसाठी कमाल दर मर्यादा 12.24 टक्क्यांनी वाढवून ती 11 हजार रुपये करण्यात आली आहे. मंत्रालयाच्या आदेशानुसार, 90 ते 120, 120 ते 150, 150 ते 180 आणि 180 ते 210 मिनिटांच्या कालावधीसाठी देशांतर्गत उड्डाण दरासाठी अनुक्रमे 5300, 6700, 8300 आणि 9800 रुपये अशी किमान मर्यादा असेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Domestic flight, Travel by flight