मुंबई, 9 जून : शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासोबत मिळून राज्यात आघाडी सरकार स्थापन केलं. तेव्हापासून हिंदुत्वाच्या (Hindutva) मुद्द्यावर भाजप **(BJP)**कडून वारंवार शिवसेनेला (Shiv Sena) डिवचण्यात येत आहे. भाजपकडून होणाऱ्या टीकेला शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी औरंगाबाद येथील सभेत (Uddhav Thackeray Aurangabad Rally) प्रत्युत्तर दिलं. यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाजप आमदार अतुल सावे यांचा उल्लेख केला आणि एक सवाल केला. त्यावर आता आमदार अतुल सावे (MLA Atul Save) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आमदार अतुल सावे यांनी म्हटलं, काल राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी माझे वडील स्वर्गीय मोरेश्वर सावे यांचा उल्लेख केला. मुख्यमंत्र्यांनी जे म्हटलं ती अतिशय दु:खद घटना आहे. माझे वडील अयोध्येला गेले होते आणि अयोध्येला जाऊन आल्यावर ते प्रखर हिंदुत्व मांडत होते. हे शिवसेनेतील नेत्यांना आवडलं नाही आणि म्हणून त्यांनी माझ्या वडिलांचं खच्चीकरण केलं. माझ्या वडिलांना लोकसभेचं तिकीटहं दिलं नाही. मुख्यमंत्र्यांनी अर्धी स्टोरी सांगितली, पूर्ण का नाही सांगितली असा माझा सवाल आहे. जर तुम्हाला इतका अभिमान होता तर माझ्या वडिलांना लोकसभेचं तिकीट का दिलं नाही? लोकांनी त्यांना दिलेली धर्मवीर ही पदवी का मान्य केली नाही? उलट तुम्ही त्यांचं खच्चीकरण केलं आणि लोकसभेचं तिकीटही दिलं नाही असंही अतुल सावे यांनी म्हटलं आहे. वाचा : ‘औरंगजेब देशासाठी शहीद झाला, ते आमचं हिंदुत्व’, मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले? कारसेवक म्हणून संभाजीनगर येथून एक ट्रेन भरुन लोक अयोध्येला गेले होते. त्यात माझे वडील सुद्धा होते. त्यावेळी शिवसेना असा विषय नव्हता. त्यावेळी प्रखर हिंदुत्व मानणारे सर्वच ज्यामध्ये विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, शिवसेना, भाजप सर्व हिंदुत्व संघटनेचे प्रतिनिधी संभाजीनगरहून ट्रेनने अयोध्येला गेले होते असंही आमदार अतुल सावे यांनी म्हटलं आहे. काय म्हणाले होते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे? हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन भाजपकडून वारंवार शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न करण्यात येतो. याच मुद्द्यावरुन औरंगाबाद येथील जाहीर सभेत बुधवारी (8 जून 2022) शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला. उद्धव ठाकरे यांनी म्हटलं, देवेंद्र फडणवीस म्हणआले की बाबरी पाडताना शिवसैनिक नव्हते. पण शिवसेनेचे मोरेश्वर सावे हे शिवसैनिकांसह अयोध्येत गेले होते. मोरेश्वर सावेंचे चिरंजीव अतुल सावे आता भाजप आहेत. हिंदुत्वाच्याच मुद्द्यावर अतुल सावे आमदार झाले. मग त्याच आमदारांना सांगा, बाबा तू ज्याची पालखी वाहतोय त्या फडणवीसांना सांग तुझे वडील तिकडे गेले होते की नव्हते. म्हणजे खरं - खोट होऊन जाऊदेत. एकतर गेले नव्हते तर तसं सांगा माझे वाबा तिकडे गेले नव्हते त्यांनी उगाच खोटं सांगितलं. जर गेले असतील तर फडणवीसांना सांगा तुम्ही कुठे होतात हे माहिती नाही पण माझे बाबा तिकडे अयोध्येला गेले होते. तमाम शिवसैनिक त्यांच्यासोबत उपस्थित होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.