Home /News /maharashtra /

'औरंगजेब देशासाठी शहीद झाला, ते आमचं हिंदुत्व', मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले?

'औरंगजेब देशासाठी शहीद झाला, ते आमचं हिंदुत्व', मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले?

औरंगाबादचं नाव बदलून संभाजीनगर करण्यात यावी, अशी शिवसेनेची गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. पण औरंगजेब नावाच्या सगळ्याच व्यक्ती सारख्या नसतात असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी त्यांच्या वक्तव्यातून स्पष्ट करुन दिलं.

    औरंगाबाद, 8 जून : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज औरंगाबादमध्ये जाहीर सभा झाली. या सभेत त्यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन भाजपवर निशाणा साधला. यावेळी त्यांनी शिवसेनेची हिंदुत्वाची भूमिका नेमकी काय आहे? याबाबत सविस्तर भाष्य केलं. यावेळी त्यांनी औरंगाबादचं नामांतरणच्या मुद्द्यावरही प्रतिक्रिया दिली. छत्रपती शिवाजी महाराजांची मुघल बादशाह औरंगजेबने खूल हाल करुन हत्या केली होती. त्यावरुन औरंगाबादचं नाव बदलून संभाजीनगर करण्यात यावी, अशी शिवसेनेची गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. पण औरंगजेब नावाच्या सगळ्याच व्यक्ती सारख्या नसतात असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी त्यांच्या वक्तव्यातून स्पष्ट करुन दिलं. यासाठी त्यांनी देशाच्या सीमेवर काश्मीरमध्ये शहीद झालेल्या औरंगजेब नावाच्या जवानाचा दाखला दिला. मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले? "काश्मीरमध्ये आज काश्मीरी पंडितांची हत्या होतेय. असाच एक सैनिक होता. तो सैनिक आपल्या देशाकडून लढत होता. त्याने अनेक अतिरेकी मारले होते. तो गनमॅन होता. सुट्टी होती म्हणून घरी जायला निघाला. पण त्याचं रस्त्यातचं अपहरण केलं गेलं. अपहरण केल्यानंतर शोधाशोध सुरु झाली. आणि मग एकेदिवशी छिन्नविछिन्न झालेला, हालहाल करुन मारलेला त्याचा मृतदेह लष्कराला सापडला. त्या सैनिकाचं नाव औरंगजेब असं होतं. जो आपल्या देशासाठी शहीद झाला. तो माझ्या देशासाठी लढला. जो माझ्या देशाला मातृभूमी समजतो, देशासाठी मरायला तयार आहे तो धर्माने कुणीही असला तरी तो आमचा आहे हे आमचं हिंदूत्व आहे", असं उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं. ('पंतप्रधानांचा फोटो कचरा कुंडीला, पण देशाने का माफी मागायची? उद्धव ठाकरेंचा थेट सवाल) "काश्मीरी पंडितांनी पुन्हा घरे सोडली आहेत. घर, शाळा, कार्यालयात जावून गोळ्या घालत आहेत. पण कुणालाच काही पडलेली नाही. हिंमत असेल तर तिकडे काश्मीरमध्ये जावून हनुमान चालीसा पठण करा. उगाच कुठेतरी दुधाचा अभिषेक करताय. अरे हे नामर्दाचं हिंदुत्व आमच्याकडे नाही. काश्मीरी पंडितांची आधी रक्षा करा", असं मुख्यमंत्री म्हणाले. "ही शिवसेना शिवसेनाप्रमुखांची नाहीय, अशी टीका करतात. मग कुणाचं आहे? मी उद्धव ठाकरे म्हणून शून्य आहे. मागे बाळासाहेब नाव आहे म्हणून मी तुमच्यासमोर आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे नाव आहे म्हणून तुम्ही सगळे माझ्यावर प्रेम करता. माझ्या भाषणाला येत आहात. उद्धव ठाकरे हा शून्य आहे. बाळासाहेबांनी जे हिंदुत्व शिकवलंय ते बरोबर आहे. त्यावरुन आता आंदोलन सुरु झालं आहे. बाळासाहेबांनी काय सांगितलं होतं की मला देवळात घंटा बडवणारा हिंदू नाही तर अतिरेक्यांना बडवणारा हिंदू पाहिजे", असं उद्धव ठाकरे म्हणाले. "आमचं हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व आहेत. भाजपच्या प्रवक्त्यांचे जे मेंदू आहेत त्या मेंदूमध्ये अक्कल घातली पाहिजे. वाट्टेल ते बोलत आहेत. विरोधी पक्षाच्या नेत्यावर बोलत आहेत. अजूनपर्यंत माझा एकसुद्धा प्रवक्ता त्या भाषेमध्ये बोललेला नाही. पण बोलणारच नाही, अशी आशा करु नका. तुम्ही आमच्यावर वेडीवाकडी टीका केली तर तुमच्या भाषेत आमचे शिवसैनिक टीका केल्याशिवाय राहणार नाहीत. भगव्याच्या पाठीमागे संस्कार आहेत. इकडे हनुमान चालीसा बोलायचं आणि पलीकडे शिव्या द्यायचं हे हिंदुत्व नाहीठ, असंदेखील ते म्हणाले.
    Published by:Chetan Patil
    First published:

    पुढील बातम्या