Home /News /mumbai /

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वप्नावर उद्धव ठाकरेंनी फेरले पाणी, फडणवीसांसह भाजपला मोठा हादरा!

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वप्नावर उद्धव ठाकरेंनी फेरले पाणी, फडणवीसांसह भाजपला मोठा हादरा!

बुलेट ट्रेन जरी असली तरी बुलेट ट्रेनचा विषय बॅकसीटला गेला, त्यावर काही चर्चा झालेली नाही किंवा कोणी विचारपूसही करत नाहीय.

    मुंबई, 26 जुलै : भारतातील पहिली बुलेट ट्रेन अर्थात अहमदाबाद -मुंबई बुलेट ट्रेन हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे महत्त्वाकांक्षी स्वप्न आहे. परंतु, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानांच्या या स्वप्नाला आता सुरंग लावला आहे. राज्यावर असलेले आर्थिक संकट आणि जनतेचं हीत पाहता  'एखादी भूमिका मी एकतर्फी घेतली असेन आणि आता अयोग्य वाटत असेल तर तो प्रकल्प मी रद्द करेन' असं उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केले आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामनामध्ये कार्यकारी संपादक आणि खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विशेष मुलाखत घेतली. या मुलाखतीचा दुसरा भाग आज प्रसिद्ध झाला. या भागात मुख्यमंत्र्यांनी राम मंदिराला जाण्यापासून ते राज्यातील राजकीय विषयांवर परखड मत व्यक्त केले आहे. राज्यावर आर्थिक संकट असताना बुलेट ट्रेन रद्द करावी, अशी चर्चा महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून सुरू आहे. त्यावर आज मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट मत व्यक्त केले. ”बुलेट ट्रेन जरी असली तरी बुलेट ट्रेनचा विषय बॅकसीटला गेला, त्यावर काही चर्चा झालेली नाही किंवा कोणी विचारपूसही करत नाही. राज्य म्हणून बुलेट ट्रेनची आवश्यकता असेल तर मी म्हणेन, माझ्या मुंबई-नागपूरला जोडणारी बुलेट ट्रेन द्या. माझी राजधानी आणि उपराजधानी जोडणारी ट्रेन द्या. जेणेकरून विदर्भाच्या मनात कारण नसताना जो दुरावा करून दिला जाण्याचा प्रयत्न केला जातो, तो दुरावा नष्ट होईल. जसा समृद्धी महामार्ग होतोय, त्याला आता शिवसेनाप्रमुखांचं नाव दिलं आहे. तसंच मुंबई-नागपूर जोडणारी बुलेट ट्रेन द्या. मला आनंद होईल.” असं उद्धव ठाकरेंनी स्पष्टपणे मत मांडलं आहे. 'बुलेट ट्रेनची गरज नाही असे आपणही म्हणाला होतात. शरद पवारही म्हणाले होते. बुलेट ट्रेनचा आपल्या राज्याला फायदा नसल्याने आपल्या राज्याने गुंतवणूक करणं योग्य नाही. तरीही महाराष्ट्रात साठ टक्के जमीन संपादन झालीय आतापर्यंत. त्यामुळे बुलेट ट्रेनचं नक्की भविष्य काय?' असा सवाल राऊत यांनी विचारला असता. उद्धव ठाकरे म्हणाले की, 'त्याची आता काही आवश्यकता नाही, पण भूसंपादन करताना ज्यांचा विरोध झालाय त्यांच्या मागे शिवसेना… शिवसेना पक्ष म्हणून ठाम उभी आहे. सरकार म्हणून जे काही करायचंय तो निर्णय आपण घेऊच, पण ज्यांचा ज्यांचा विरोध आहे त्यांच्या मागे शिवसेना आहे. आता काही जणांनी स्वतःहून जमीन दिली असेल तर काय करणार? संजय राऊत - बुलेट ट्रेन होणार की नाही? असा माझा थेट प्रश्न आहे. कारण त्यात राज्य सरकारची गुंतवणूक आहे. उद्धव ठाकरे – सांगतो. आधी मी जमिनीचा विषय घेतो. ज्यांनी स्वतःहून जमीन दिली, त्यांचा व्यवहार आतापर्यंत पूर्ण झाला असेल. पण ग्रामीण भागातील तळागाळातील लोकांचा अजूनही विरोध आहे. त्यांच्यामागे शिवसेना ठाम उभी आहे. जसा नाणारचा विषय आहे. नाणारचासुद्धा सरकारने करार केलाच होता, पण तो जनतेने हाणून पाडला. आम्ही शिवसेना म्हणून जनतेच्या सोबत उभे राहिलो. आता सगळय़ांना मान्य असेल तर सरकार म्हणून करू करार. पण मधले दोन-तीन महिने आपले कोरोनामध्ये गेले. त्यामुळे सगळे विषय मागे पडले. संजय राऊत - बुलेट ट्रेनचे काय? उद्धव ठाकरे – बुलेट ट्रेन जरी असली तरी बुलेट ट्रेनचा विषय बॅकसीटला गेला, त्यावर काही चर्चा झालेली नाही किंवा कोणी विचारपूसही करत नाहीय. यावरही आता सरकार म्हणून निर्णय घेताना राज्याच्या हिताचा विचार करूनच निर्णय घ्यावा लागतो. माझी भूमिका वैयक्तिक वेगळी असू शकते, जी अर्थातच जनतेसोबत राहण्याची आहे, पण राज्याच्या हिताचा विषय येईल, त्या वेळी यात हित आहे की अहित आहे याचा विचार करावा लागेल. माझं मत असं आहे की, सगळय़ांना एकत्र बोलावून आपल्याला हा निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. संजय राऊत - सरकारने अडीचशे, तीनशे कोटी रुपये का द्यावेत? असा प्रश्न आपण सगळ्यांनीच उपस्थित केला होता. उद्धव ठाकरे – नक्कीच. तो माझा मुद्दा आजही कायम आहे. पण आता सरकार म्हणून आम्ही असताना या ‘का?’ची सोडवणूक करण्याची गरज आहे. ‘का?’ला काही कारणं आहेत का? खरंच यातून काही फायदा होणार आहे का दाखवा आम्हाला. काय होणार फायदा? किती मुंबईतून आणि सूरतमधून ये-जा होणार आहे? किती आर्थिक घडामोड होणार आहे? हे सरकार म्हणून मला माहिती मिळू द्या. जर पटली तर जनतेसमोर ठेवतो, पण एखादी भूमिका मी एकतर्फी घेतली असेन आणि आता अयोग्य वाटत असेल तर तो प्रकल्प मी रद्द करेन. तुम्ही तुकाराम मुंढेंसोबत आहात की नागपूर महापालिकेच्या? उद्धव ठाकरे म्हणाले... संजय राऊत - ‘एमओयू’वर किती विश्वास ठेवता तुम्ही? याआधीच्या सरकारमध्येसुद्धा उद्योगमंत्री आपलेच होते. त्या वेळीही असेच एमओयू झाले होते, पण त्यातली गुंतवणूक काही इथे आली नाही. उद्धव ठाकरे – एक लक्षात घ्या, नुसता एकटा उद्योगमंत्री तुमचा असून चालत नाही. तुमच्या सरकारची भूमिकाही महत्त्वाची असते आणि त्या काळात मी मगाशी उल्लेख केला तसे हे गुंतवणुकीचे करार होत असताना नोटाबंदी आली, एक प्रकारची अनिश्चितता निर्माण झाली. अशी धोरणांची अनिश्चितता असेल तर गुंतवणूक येणार नाही. गुंतवणूकदारांमध्ये जो विश्वास लागतो तो निर्माण करतो आहोत. त्यातून ही गुंतवणूक येईल हे नक्की. ही गुंतवणूक येत असताना आधी असलेले जे उद्योगधंदे आहेत, त्यांना तर आपण गो अहेड दिलेले आहे. ते काम चालू करताहेत. मात्र जिथे लॉकडाऊन नाही, तिथे पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव आढळला तर नाइलाजाने पुन्हा लॉकडाऊन करण्याचा निर्णय घ्यावा लागतोय. अर्थात हा तात्पुरता पर्याय आहे. त्यामुळे सगळं काही संपलंय असं समजण्याचं कारण नाही. मी अजिबात निराशावादी नाही आणि मी कुणाला निराशावादी होऊ देणार नाही.   संजय राऊत - पण गेली पाच वर्षे जे सरकार होतं, त्या सरकारमध्ये आपणही होतात. या काळात केंद्र असेल, राज्य असेल, मेक इन इंडिया, स्टार्टअप फेल गेलंय… उद्धव ठाकरे – त्या वेळीही ‘सामना’ने माझ्या मुलाखती घेतलेल्या आहेत. त्या वेळच्या मुलाखती वाचा. म्हणजे माझी त्या वेळची भूमिका पडताळून पाहता येईल. संजय राऊत - स्टार्टअप, मेक इन इंडिया, त्यानंतर एमओयू झाले. पण दुर्दैवाने असे कोणतेही एमओयू शेवटपर्यंत प्रत्यक्ष कृतीत आले नाहीत उद्धव ठाकरे – हे अवलंबून राहतं त्या त्या सरकारच्या धोरणावर. नुसती उत्सवप्रियता असेल तर काही होणार नाही. आता महाविकास आघाडीचे साथीसोबती आहेत. ते सकारात्मक आहेत. शरद पवारसाहेब आहेत. काँग्रेसच्या सोनियाजी आहेत. शिवाय राज्यातील काँगेसची इतर नेतेमंडळी आहेत. या सगळय़ांसह तिन्ही पक्षांना जे अनुभवातून शहाणपण आले आहे ते शहाणपण आता आपण आपल्या कामात दाखवतो आहोत. आतापर्यंत मागे वळून बघताना आपल्याकडून काय राहून गेलं याचाही विचार होतो. पक्षाची लेबले लावून मी बघत नाही. सरकार हे सरकार असतं. या सरकारकडून काय राहिलं होतं, काय चांगलं झालं होतं याचा आढावा घेत आपण काम करतो आहोत आणि महत्त्वाचं म्हणजे (मिश्किल हसत) 16 हजार कोटींच्या एमओयूचं कामही मी घरात बसून केलं आहे. 44 जणांनी कोरोनाला हरवलं जोमात, झिंगाट गाण्यावर तुफान डान्सचा VIDEO संजय राऊत - हो, आम्ही पाहिलं ते… उद्धव ठाकरे – हो, घरबसल्याच केलंय. मी कुठेही भटकत गेलो नव्हतो. इकडे जा, तिकडे जा असलं काही केलं नाही. आपली जी सिस्टीम आहे, त्या सिस्टीममध्येच काम केलं. सिस्टीमच काम करतेय. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे या गुंतवणुकीसंदर्भात आम्ही बैठका घेतल्या, चर्चा करून निर्णय घेतले. परदेशातले लोक त्यांच्या देशातून सहभागी झाले होते. आपले काही लोक इथून सहभागी झाले. मी घरातून भाग घेतला. सुभाष देसाईसाहेब आणि सगळे सहकारी मंत्रालयातून सहभागी झाले. संजय राऊत - या गुंतवणुकीत चीनची गुंतवणूक किती… उद्धव ठाकरे– चीनची गुंतवणूक किती यापेक्षा चिनी गुंतवणूक आपल्या देशात असावी की नसावी हा महत्त्वाचा भाग आहे. मध्यंतरी पंतप्रधान मोदींनी चीनच्या प्रश्नाबाबत व्हिडीओ कॉन्फरन्स घेतली होती, तेव्हा मी त्यात विचारले होते की, तुम्ही देशाचं एक धोरण ठरवा. माझी आजही ही आग्रही मागणी आहे. संजय राऊत - आपली नेमकी भूमिका काय आहे याविषयी? उद्धव ठाकरे – आपल्याकडे काय होतं की पाकिस्तानबरोबर संबंध जरा ताणले गेले की, मग पाकिस्तान मुर्दाबाद. पाकिस्तानबरोबर कोणतेही संबंध नकोत. त्यांच्यासोबत खेळ नको, क्रीडा नको, हे नको, ते नको. आणि जर ओसरलं वातावरण की, भूमिका बदलते. मग खेळ आणि राजकारण तुम्ही एकत्र आणू नका, कला आणि राजकारण एकत्र आणू नका, ही सगळी बौद्धिकं ऐकवली जातात. पण ताणलं जातं तेव्हा आपली भूमिका ‘खबरदार, जर टाच मारुनी…’ अशी असते. मग तो खेळाडू पण नको, कलावंत पण नको, काही उद्योग नको. तसे चीनच्या बाबतीत व्हायला नको. याला म्हणता क्वालिटी! टाटाच्या नॅनोला भिडली होंडा सिटी, पण तोंडच चेपले, VIDEO तुम्ही चीनच्या बाबतीत एकदा ठरवा, वस्तू तर सोडाच, पण उद्योगधंदे आपण आणायचे की नाही आणायचे हे. देशाचं धोरण असलं पाहिजे. राष्ट्रभक्ती ही सगळय़ा देशाची सारखी असली पाहिजे. माझी आहे. आपण हे सगळे करार होल्डवर ठेवले आहेत. नको असेल तर परत पाठवू, पण उद्या तुम्ही ‘हिंदी-चिनी भाई भाई’ म्हणून चीनच्या पंतप्रधानांना फिरवणार असाल तर ही संधी आपण घालवायची का? आणि घालवायची असेल तर एकदा दिशा ठरवा, आपण जाऊ पुढे.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या