औरंगाबाद, 26 जुलै : महाराष्ट्रात कोरोनाने थैमान घातले आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. पण, कोरोनावर मात करणाऱ्यांचीही संख्या वाढत आहे. औरंगाबादमध्ये एकाच वेळी 44 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्या आनंदात सर्व रुग्णांनी झिंगाट गाण्यावर तुफान डान्स केला.
औरंगाबादमधील बजाज विहार कोविड केअर सेंटरमधून एकूण 44 रुग्णास डिस्चार्ज देण्यात येणार आहे. सकाळी 10 वाजेच्या या रुग्णांना घरी सोडण्यात येणार आहे. या सर्व रुग्णांचे रिपोर्ट हे पूर्णपणे निगेटिव्ह आले आहे.
#औरंगाबाद - बजाज विहार कोविड केअर सेंटर मधून एकूण ४४ रुग्णास डिस्चार्ज देण्यात येणार, त्या सर्व रुग्णांनी झिंगाट गाण्यावर डान्स करत केला आनंद व्यक्त pic.twitter.com/3ENK6p5PBr
— News18Lokmat (@News18lokmat) July 26, 2020
14 दिवसांच्या उपचारानंतर घरी जाण्यास मिळणार असल्यामुळे या रुग्णांनी एकच जल्लोष केला. घरी जाण्याआधी सर्व रुग्णांनी झिंगाट गाण्यावर डान्स करत आनंद व्यक्त केला. कोरोना आजारावर आपण मात केली आहे. तसंच कोरोना आजाराला घाबरायचं नाही तर हसत खेळत सामना करायचा आहे, असा संदेश या रुग्णांनी दिला.
जिल्ह्यात 8159 कोरोनामुक्त, 4312 रुग्णांवर उपचार सुरू
दरम्यान, औरंगाबाद जिल्ह्यात आज 406 जणांना (मनपा 265, ग्रामीण 141) डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजपर्यंत 8159 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 237 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 12908 झाली आहे. आजपर्यंत एकूण 437 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 4312 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
'गँग ऑफ वासेपूर' स्टाइल कैद्यांनी ठोकली धूम, जळगाव कारागृहातील घटनेचा VIDEO
दुपारनंतर 197 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. यामध्ये अँटीजेन टेस्टद्वारे केलेल्या तपासणीत सिटी एंट्री पॉइंटवर 11, मोबाईल स्वॅब कलेक्शन पथकास 73 आणि ग्रामीण भागात 76 आढळलेले आहेत. तर पाच कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.