जाहिरात
मराठी बातम्या / मुंबई / 'मला माझ्याच लोकांनी धोका दिला', मुख्यमंत्री मंत्रिमंडळ बैठकीत भावुक

'मला माझ्याच लोकांनी धोका दिला', मुख्यमंत्री मंत्रिमंडळ बैठकीत भावुक

'मला माझ्याच लोकांनी धोका दिला', मुख्यमंत्री मंत्रिमंडळ बैठकीत भावुक

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आजच्या कॅबिनेट बैठकीत भावुक झाले. त्यांनी आपल्या मंत्रिमंडळातील सदस्यांचे दीड वर्षांपासून केलेल्या सहकार्याबद्दल आभार मानले.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 29 जून : राज्य मंत्रिमंडळाची (Cabinet Meeting) आज महत्त्वाची बैठक झाली. शिवसेनेचे (Shiv Sena) 40 आमदारांनी बंड पुकारल्यामुळे महाविकास आघाडी सरकारवर (Maha Vikas Aghadi Government) संकट कोसळलं आहे. विशेष म्हणजे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांनी उद्या विशेष अधिवेशन भरवून बहुमत सिद्ध करण्याचा आदेश दिला आहे. त्यामुळे हे सरकार कदाचित कोसळू शकतं, असा अंदाज बांधला जातोय. त्याच पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी सरकारची आजची शेवटची कॅबिनेट बैठक असल्याचा मानलं जात आहे. या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray Emotional in Cabinet Meet) हे भावुक झाले. त्यांनी आपल्या मंत्रिमंडळातील सदस्यांचे दीड वर्षांपासून केलेल्या सहकार्याबद्दल आभार मानले. मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले? “तुम्ही जे सहकार्य केले त्यासाठी धन्यवाद! आता जी कायदेशिर प्रक्रिया त्याला सामोरे जाऊ. मला माझ्याच लोकांनी धोका दिला म्हणून सध्याची परिस्थिती निर्माण झाली. हे दुर्देवी आहे. या अडीच वर्षात तुम्ही सहकार्य केलं. माझ्याकडून कुणाचा अपमान झाला असेल, किंवा कुणी दुखावले असतील तर मी माफी मागतो”, असं मुख्यमंत्री आजच्या बैठकीत म्हणाले. ( ठाकरे सरकारचा सर्वात मोठा निर्णय, औरंगाबाद शहराच्या संभाजीनगर नामकरणास मान्यता ) या बैठकीनंतर जयंत पाटील यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री बैठकीत काय म्हणाले याबाबत माहिती दिली. मुख्यमंत्र्यांनी दोन्ही पक्षांचे सहकार्याबद्दल समाधान व्यक्त केले. तीन वेगवेगळ्या विचारसरणीचे पक्ष एकत्र आले. इतर दोन्ही पक्षांनी चांगलं सहकार्य केलं म्हणून त्यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले, असं जयंत पाटील यांनी सांगितलं. तसेच राजीनामाबाबत त्यांनी कोणतंही विधान केलं नाही, अशी माहितीदेखील त्यांनी दिली. राज्य मंत्रिमंडळात तीन ऐतिहासिक निर्णय दरम्यान, राज्य मंत्रिमंडळात आज खूप मोठा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत औरंगाबाद शहराच्या संभाजीनगर नामकरणास मान्यता देण्यात आली आहे. औरंगाबाद शहराचा नामकरणाचा मुद्दा गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला आहे. भाजप आणि मनसेकडून नामकरणाच्या मुद्द्यावरुन अनेकदा महाविकास आघाडी सरकारला घेरण्यात आलं आहे. त्यामुळे अखेर महाविकास आघाडी सरकारकडून याबाबतचा आज निर्णय घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे महाविकास आघाडीच्या 50 आमदारांनी बंडखोरी केल्यामुळे हे सरकार कोसळण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे राज्य मंत्रिमंडळाची ही शेवटची बैठक असल्याची शक्यता वर्तवली जात होती. त्याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने औरंगाबाद नामकरणाचा निर्णय घेतल्याची चर्चा सुरु झाली आहे. विशेष म्हणजे फक्त औरंगाबादच नाही तर उस्मानाबाद शहराचं देखील धाराशीव नामकरणास मान्यता देण्यात आली आहे. ठाकरे सरकारचे महाराष्ट्राच्या इतिहासातील हा सर्वात मोठे निर्णय मानले जातील.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात