• Home
 • »
 • News
 • »
 • mumbai
 • »
 • ''माझं नाव सनी, मी बाहेर जाऊ शकतो का?'', प्रश्न विचारणाऱ्याला मुंबई पोलिसांचा हटके रिप्लाय

''माझं नाव सनी, मी बाहेर जाऊ शकतो का?'', प्रश्न विचारणाऱ्याला मुंबई पोलिसांचा हटके रिप्लाय

मुंबई पोलीस (Mumbai Police) नागरिकांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी नेहमीच ट्वीटरवर अॅक्टिव्ह असतात.

 • Share this:
  मुंबई, 27 मे: मुंबई शहरात सध्या कोरोनाचा प्रार्दुभाव आटोक्यात येत असल्याचं चित्र आहे. तरी देखील कोरोनाला रोखण्यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना आखल्या जात आहे. कोरोनासारख्या परिस्थितीत मुंबई पोलीसही सतर्क राहून नेहमी आपली चोख भूमिका बजावताना दिसतात. कोरोनाला रोखण्यासाठी प्रशासनानं लॉकडाऊन जाहीर केलं. लॉकडाऊनच्या काळात प्रशासनाकडून नियमावली जाहीर करण्यात आली आहे. या नियमावलीनुसार विनाकारण रस्त्यावर नागरिकांना फिरण्यास मनाई आहे. तरी देखील काही जण नियमांची पायमल्ली करताना दिसतात. मात्र एक व्यक्ती आहे ज्यानं थेट मुंबई पोलिसां ( Mumbai Police)ना बाहेर फिरण्यासाठी परवानगी मागितली. त्यावर मुंबई पोलिसांनी त्याला सर्वात हटके उत्तर देत सर्व नेटकऱ्यांची मनं जिंकली आहे. मुंबई पोलिसांच्या या उत्तराचं ट्वीटर (Tweet) वर बरीच चर्चा आहे. मुंबई पोलीस नागरिकांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी नेहमीच ट्वीटरवर अॅक्टिव्ह असतात. कधी मीम्स, सिनेमातील डायलॉगचा वापर करत पोलीस ट्विटरवर कोरोना व्हायरस, लॉकडाऊन नियमांसंदर्भात जागरुकता निर्माण करत असतात. आता मुंबई पोलीस (Mumbai Police Commissioner) आयुक्तांनी एक ट्वीट केलं होतं. त्या ट्वीटमध्ये होतं की, एक उन्हाचा दिवस आहे. भर उन्हात बाहेर जाण्यापेक्षा घरीच राहणं सोयीस्कर आहे. यावर एका यूजरनं वरिष्ठ पोलिसांच्या पोस्टवर रिप्लाय करत मुंबई पोलिसांच्या ट्वीटर हँडलवर एक प्रश्न विचारला. या यूजरनं विचारलं, ''सर माझं नाव सनी. मी बाहेर जाऊ शकतो का? ” मुंबई पोलिसांनी या यूजरला हटके रिप्लाय करत नेटकऱ्यांची मनं जिंकली आहेत. सौर यंत्रणेच्या मध्यभागी तारा, ज्याभोवती पृथ्वी आणि सौर यंत्रणेचे इतर घटक फिरतात. त्याच्या खांद्यावर एक मोठी जबाबदारी असते. त्यामुळे त्याने स्वत: चे आणि आजूबाजूच्या लोकांचे रक्षण केलं पाहिजं. त्यामुळे बाहेर पाऊल न टाकता आणि स्वत: ला कोरोना व्हायरसच्या संपर्कात आणू नका. मुंबई पोलिसांनी केलेल्या रिप्लायवर अनेक यूजरनं प्रतिक्रिया दिल्या आहेत.
  Published by:Pooja Vichare
  First published: