Home /News /mumbai /

मुख्यमंत्र्यांची धडाकेबाज कामगिरी, ठाण्याला वेगळं धरण, 900 खाट्याचं नवं सिव्हील हॉस्पिटल, मोठ्या घोषणा

मुख्यमंत्र्यांची धडाकेबाज कामगिरी, ठाण्याला वेगळं धरण, 900 खाट्याचं नवं सिव्हील हॉस्पिटल, मोठ्या घोषणा

एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी ठाणे शहरासाठी खूप मोठा निर्णय घेतला आहे. त्यांनी ठाण्यातील 86 वर्षे जूने सिव्हील हॅास्पिटल नवीव बनवण्याचे आदेश दिले आहेत.

    मुंबई, 6 जुलै : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी ठाणे (Thane) शहरासाठी खूप मोठा निर्णय घेतला आहे. त्यांनी ठाण्यातील 86 वर्षे जूने सिव्हील हॅास्पिटल (Thane Civil Hospital) नवीव बनवण्याचे आदेश दिले आहेत. त्याबाबतच्या सूचना त्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. मुख्यमंत्र्यांनी आदेश दिल्यानंतर ठाण्यात निर्माण होणारं नवं सिव्हील हॉस्पिटल हे 900 खाटांचे होणार आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांनी ठाण्यासाठी वेगळं धरण उभारण्याची घोषणा केली आहे. ठाणेकरांचा पाणीप्रश्न मिटवण्यासाठी त्यांनी हा मोठा निर्णय घेतला आहे. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून एकामागेएक चांगल्या कामांचा सपाटा लावला आहे. एकनाथ शिंदे यांनी ठाणे शहरासाठी मोठी तरतूद केली आहे. ठाण्यातील जुन्या सिव्हील हॉस्पिटलला नवसंजीवनी देण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. हे हॉस्पिटल तब्बल 900 खाटांचे इतकं मोठं उभारलं जाणार आहे. मुख्यमंत्र्यांनी त्यासाठी रखडलेली टेंडर प्रक्रिया पुढच्या 15 दिवसात पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. ठाण्यासाठी मंजूर झालेला 527 कोटींचा निधी तात्काळ देण्याचे आदेश दिले आहेत. विशेष म्हणजे त्यासाठी शिंदे यांनी सार्वजनिक विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर देखील धरल्याची माहिती समोर आली आहे. गोरगरिबांचे रुग्णालय म्हणून ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयाकडे पहिले जाते. त्यात या रुग्णालयात जिल्ह्यातीलच नव्हे तर, पालघर जिल्ह्यातूनही रुग्ण उपचारासाठी येत असतात. या रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या गोरगरीब रुग्णांना उच्च व उत्तम दर्जाचे उपचार मिळावे यासाठी जिल्हा रुग्णालयाचे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये रूपांतर करण्यात येणार आहे. सुरुवातीला 574 खाटांच्या बेडला हिरवा कंदील अगोदरच सरकारने दिला होता. मात्र, भविष्यातील वाढत्या लोकसंख्येचा विचार करता, नियोजित खाटांची संख्या वाढवून 900 खाटांच्या प्रस्ताव शासनास्तरावर पाठविण्यात आला होता. त्यासही मान्यता मिळाली होती. जिल्हा रुग्णालयाच्या बांधकामासाठी 527 कोटींच्या रक्कमेस प्रशासकीय मान्यता देखील मिळाली आहे. त्यामुळे जिल्हा रुग्णालयाच्या सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलचा मार्ग मोकळा झाला आहे. (महाराष्ट्रातल्या झटक्यानंतर दिल्लीत शिवसेना सावध, लोकसभेतील प्रतोद बदलला!) ठाणे जिल्ह्याचे झपाट्याने नागरिकीकरण होत आहे. दिवसेंदिवस जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली असून रुग्णालयावर ताण वाढत आहे. त्यात काहीवेळा गंभीर आजाराकरिता रुग्णांना उपचार मिळत नाही आणि रूग्णांची दुसऱ्या रुग्णालयात नेण्याची धावाधाव सुरू होते. याची गांभीर्याने दाखल घेत, या सर्व घटना टाळण्यासाठी सिव्हिल रुग्णालयाचे रुपडं पालटलं जात आहे. दोन वर्षांपूर्वी सिव्हिल रुग्णालयाचे रूपांतर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये करण्याला राज्य शासनाने मंजुरी दिली होती. त्यावेळी हॉस्पिटल बांधण्यासाठी सरकारने 314 कोटींचा निधी दिला आहे. मात्र, नंतर कोरोनाच्या महामारीमुळे पुढील गोष्टींना विलंब झाला. परंतु, रुग्णालय आणखी मोठं करण्याचा प्रस्तावाबाबत विचारविनिमय सुरू आहे. खाटांची संख्या वाढवून ते आणखी सुसज्य केले जाणार आहे. आणि याबाबतच्या प्रस्तावाला लवकरच मंत्रालतातून शिक्कामोर्तब केला जाईल अशी माहिती जिल्हाशल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार यांनी सांगितले होते. सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल बांधण्याला सरकारने परवानगी देत, ५७४ खाटांचे हॉस्पिटल बांधण्याचे ठरले होते. मात्र, भविष्यातील जिल्ह्यातील वाढत्या नागरीकीकरण व विस्तारीकरणामुळे वाढणाऱ्या लोकसंख्येचा विचार करता, खाटांची संख्या वाढवणे क्रमप्राप्त आहे. रुग्णांना चांगले उपचार मिळावेत यासाठी रुग्णालय प्रशासनाने विचार करून वास्तू उभी रहाण्यापूर्वी खाटांची संख्या ९०० करण्यात आली आहे. त्यानुसार नवा प्रस्ताव तयार करून तो शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला होता. या प्रस्तावामध्ये २०० सुपर स्पेशालिटी, २०० लहान मुलं, डिलिव्हरी आणि महिला आणि ५०० खाटा जनरल रुग्णासाठी ठेवण्याचे सुचविले होते. यात जनरल खाटा मध्ये आर्थो, डोळे, रक्ताचे आजार, ज्येष्ठ नागरिक, डायलिसिस,आयसीयू नाक, कान घसा आदी सर्वांचा समावेश असणार आहे. हॉस्पिटल उभारणीचा खर्च वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. दरम्यान, शुक्रवारी जिल्हा सामान्य रुग्णालयच्या ९०० बेडसच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या बांधकामासाठी ५२७ कोटींच्या रक्कमेस प्रशासकीय मान्यता देखील मिळाली आहे. यामध्ये सेवा रुग्णालय व परिचारिका प्रशिक्षण केंद्र आणि वसतीगृह इमारतींचा देखील समावेश असणार आहे. त्यामुळे जिल्हा रुग्णालयाच्या सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलचा मार्ग मोकळा झाला आहे. पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी पंढरपुरला आषाढी एकादशीसाठी जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. पंढरपूर (Pandharpur) येथे आषाढीच्या वारीसाठी जाणाऱ्या वारकऱ्यांच्या वाहनांना टोल माफ करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde Wari Decision 2022) यांनी जाहीर केला आहे. यासाठी वारकऱ्यांना वाहनांवर स्टिकर्स लावणे तसेच प्रादेशिक परिवहन अधिकारी आणि पोलिसांकडे नोंदणी करणे, याबाबत व्यवस्था करण्याचे निर्देशही त्यांनी मुख्य सचिवांना दिले आहेत. आषाढी वारीच्या निमित्ताने यावर्षी मोठ्या प्रमाणात वारकरी वारीमध्ये सहभागी झाले आहेत. तर आषाढी यात्रेच्या निमित्ताने यावर्षी पंढरपूरात मोठ्या प्रमाणा गर्दी वाढेल. त्यामुळे चंद्रभागेत स्नानासाठीची व्यवस्था चोख व्हावी. याठिकाणी चांगली स्वच्छता, त्यासाठी आवश्यक गोष्टींची काळजी घ्यावी लागेल. काठावरील निर्माल्य कलशाची संख्या वाढवा. ते वेळोवेळी रिकामी होतील, अशी व्यवस्था करा, असे निर्देशही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.
    Published by:Chetan Patil
    First published:

    Tags: Eknath Shinde, Maharashtra News, Shiv sena

    पुढील बातम्या