जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / महाराष्ट्रातल्या झटक्यानंतर दिल्लीत शिवसेना सावध, लोकसभेतील प्रतोद बदलला!

महाराष्ट्रातल्या झटक्यानंतर दिल्लीत शिवसेना सावध, लोकसभेतील प्रतोद बदलला!

महाराष्ट्रातल्या झटक्यानंतर दिल्लीत शिवसेना सावध, लोकसभेतील प्रतोद बदलला!

महाराष्ट्रामध्ये झालेल्या राजकीय भुकंपानंतर शिवसेना (Shivsena) दिल्लीमध्ये आधीच सावध झाली आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या आधी शिवसेनेने प्रतोद बदलला आहे. शिवसेना खासदार भावना गवळी (Bhavana Gawali) यांची लोकसभेतील शिवसेनेच्या प्रतोद पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 6 जुलै : महाराष्ट्रामध्ये झालेल्या राजकीय भुकंपानंतर शिवसेना (Shivsena) दिल्लीमध्ये आधीच सावध झाली आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या आधी शिवसेनेने प्रतोद बदलला आहे. शिवसेना खासदार भावना गवळी (Bhavana Gawali) यांची लोकसभेतील शिवसेनेच्या प्रतोद पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. शिवसेना संसदीय नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केंद्रीय संसदीय मंत्री प्रल्हाद जोशी आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहिलं आहे. या पत्रात भावना गवळी यांना प्रतोद पदावरून हटवण्याची मागणी केली आहे. शिवसेना खासदार राजन विचारे (Rajan Vichare) हे शिवसेनेचे लोकसभेतील नवे प्रतोद असतील. मुख्य म्हणजे राजन विचारे हे एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्याच्या मतदारसंघातूनच लोकसभेमध्ये निवडून गेले आहेत. शिवसेनेने संसदेचं पावसाळी अधिवेशन आणि राष्ट्रपतीपदाची निवडणूक तोंडावर असताना भावना गवळी यांची प्रतोदपदावरून हकालपट्टी केली आहे, त्यामुळे भावना गवळीही बंडाच्या तयारीत आहेत का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

News18

18 तारखेपासून संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. तसंच याच दिवशी राष्ट्रपतीपदाची निवडणूक होणार आहे. द्रौपदी मुर्मू या भाजप पुरस्कृत एनडीएच्या उमेदवार आहेत, तर युपीएने यशवंत सिन्हा यांना रिंगणात उतरवलं आहे. शिवसेनेचे मुंबईतील खासदार राहुल शेवाळे (Rahul Shewale) यांनी कालच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून द्रौपदी मुर्मू (Draupadi Murumu) यांना पाठिंबा देण्याची मागणी केली होती. याला 24 तास होत नाहीत तोच शिवसेनेने लोकसभेतला आपला प्रतोद बदलला, त्यामुळे शिवसेनेला महाराष्ट्रापाठोपाठ दिल्लीतही बंड होणार याची कुणकुण लागली का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. प्रतिभा पाटील, प्रणब मुखर्जी आणि आता द्रौपदी मुर्मू… शिवसेना पुन्हा विरोधी भूमिका घेणार? महाराष्ट्रात सत्तानाट्य सुरू असताना प्रतोद किती महत्त्वाचा ठरू शकतो, हे दिसून आलं आहे. पक्षाच्या प्रतोदांनाच व्हीप काढण्याचे अधिकार असतात, या व्हीपचं आमदार अथवा खासदाराने उल्लंघन केलं, तर त्याच्यावर पक्षविरोधी काम केल्यामुळे कारवाई होते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात