मनसेनं पत्राद्वारे केली होती मागणी सर्वसामान्यांना लोकल प्रवास सुरु करावा, यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं होतं. या पत्राद्वारे त्यांनी सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा सुरु करण्याची मागणी केली होती.#MumbaiLocals#मुंबईलोकल pic.twitter.com/k9IlIT1JS3
— MNS Adhikrut - मनसे अधिकृत (@mnsadhikrut) August 8, 2021
युरिक अॅसिडच्या त्रासात वापरा ‘हे’ गोड औषध; संपेल सगळा त्रास; संशोधकांचा दावा
15 ऑगस्टपासून लोकल प्रवास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून राज्यातील जनतेशी संवाद साधला. यावेळी लोकल सुरू करण्याबद्दल खुलासा केला आहे. मुंबईमध्ये लोकल प्रवास 15 ऑगस्टपासून करता येणार आहे. पहिल्या टप्प्यामध्ये ज्यांनी लशीचे दोन्ही डोस घेतले आहे. त्यांना १४ दिवसपूर्ण झाले आहे. त्यांना हा प्रवास करता येणार आहे. या सर्व नागरिकांसाठी एक अॅप तयार केला आहे, या अॅपवर नोंदणी करावी लागणार आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सांगितलं. तसंच, कोविड काळामध्ये मुंबईतील उपनगरीय रेल्वेमधून सर्वसामान्य प्रवाशांना प्रवास करण्यासाठी निर्बंध टाकण्यात आले आहेत. यासंदर्भात अनेक प्रवासी संघटना तसेच नागरिकांनी वारंवार लोकल सेवा वापरण्यास परवानगी द्यावी अशी विनंती केली आहे. आपणा सर्वास माहितच आहे की अद्याप आपण दुसऱ्या लाटेतून देखील पूर्णपणे सावरलेलो नाही. संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका देखील आहे. केंद्र सरकारने देखील आपणास वारंवार याबाबत इशारा दिला आहे, असंही मुख्यमंत्री म्हणाले.मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: MNS, Mumbai local, Raj Thackeray (Politician), Uddhav thackeray