मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /फडणवीसांनी मैदान गाजवल्यानंतर ठाकरे करणार जोरदार पलटवार, राजकीय वातावरण तापणार

फडणवीसांनी मैदान गाजवल्यानंतर ठाकरे करणार जोरदार पलटवार, राजकीय वातावरण तापणार

State Budget Session : भाजपच्या आरोपांवर मुख्यमंत्रीही तितक्याच ताकदीने उत्तर देतील. त्यामुळे पुन्हा सरकार विरुद्ध विरोधक सामन्याकडे अवघ्या राज्याचं लक्ष असणार आहे.

State Budget Session : भाजपच्या आरोपांवर मुख्यमंत्रीही तितक्याच ताकदीने उत्तर देतील. त्यामुळे पुन्हा सरकार विरुद्ध विरोधक सामन्याकडे अवघ्या राज्याचं लक्ष असणार आहे.

State Budget Session : भाजपच्या आरोपांवर मुख्यमंत्रीही तितक्याच ताकदीने उत्तर देतील. त्यामुळे पुन्हा सरकार विरुद्ध विरोधक सामन्याकडे अवघ्या राज्याचं लक्ष असणार आहे.

मुंबई, 2 मार्च : विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात (State Budget Session) आजचा दुसरा दिवस सर्वाथाने विरोधी पक्षाचा होता. आज विरोधकांच्या मागणीवर राज्य सरकारनं सभागृहात चर्चा घेऊन निर्णय होईपर्यंत राज्यात वीज तोडणी थांबवण्याचा आदेश दिला. तर विधानसभेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी राज्यपालांच्या अभिभाषणावर तब्बल पाऊणेदोन तास भाषण करत राज्य सरकारच्या कारभाराची पिसं काढत हल्लाबोल केला.

राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चेचा दुसरा आणि अंतिम दिवस उद्या आहे. भाजपचे आमदार आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार (BJP Leader Sudhir Mungantiwar) पुन्हा एकदा सरकारवर उद्या तोफ डागणार आहेत. तर या सगळ्या चर्चेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) उत्तर देतील. मुख्यमंत्रीही तितक्याच ताकदीने उत्तर देतील. त्यामुळे पुन्हा सरकार विरुद्ध विरोधक सामन्याकडे अवघ्या राज्याचं लक्ष असणार आहे.

राज्य विधीमंडळाचे कामकाज सुरु होण्यापूर्वीच आज विधान भवनाच्या प्रवेशद्वारापाशी घोषणाबाजी सुरु झाली होती. माळशिरसचे आमदार राम सातपुते आपल्या गळ्यात पाण्याची मोटर अडकवत बिलं न भरल्यामुळे राज्यात वीज कनेक्शन तोडली जात असल्याच्या कारवाईचा विरोध करत जोरदार घोषणाबाजी केली. नंतर विरोधकांनी विधीमंडळाच्या पायऱ्यांवर बसत सरकारने वीज तोडणी तातडीने थांबवावी अशी आग्रही मागणी केली.

विधानसभेत दिवसाचं कामकाज प्रश्नोत्तरानं सुरु होणार होतं. पण वीजेच्या प्रश्नावर तातडीने नियम 57 अन्वये चर्चा व्हावी अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. त्यावर लोकप्रतिनिधींची भूमिका आणि जनमानसात असलेला रोष पाहता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभागृहात या विषयावर चर्चा होऊन निर्णय होणार नाही तोपर्यंत वीज तोडणी तातडीने थांबवण्याचे आदेश दिले. या निर्णयाने राज्यातील जनतेला मोठा दिलासा मिळाला. त्यासोबतच विरोधी पक्ष भाजपला आपली मागणी मान्य झाल्याने एक मोठा मुद्दा सर करण्यात यश मिळालं.

हेही वाचा - मोठी बातमी : नवी मुंबईत राष्ट्रवादी-शिवसेनेच्या अडचणी वाढणार? काँग्रेसने घेतली आक्रमक भूमिका

खरं तर उर्जा खातं हे काँग्रेसचं. पण उपमुख्यमंत्री या नात्याने अजित पवारांनी घोषणा केली खरी, पण खातं जरी काँग्रेसचं असलं तरीही सरकारमध्ये वरचष्मा मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचाच हे पुन्हा एकदा सिद्ध झालं असल्याची चर्चा या निमित्ताने सुरु झाली. 100 युनिट्सपर्यंतची वीज मोफत देण्याची घोषणा याआधी उर्जा मंत्री नितीन राऊत यांनी केली होती. पण अजित पवारांनी तेव्हाही रेड सिग्नल दिल्याने ती घोषणा हवेतच विरली होती.

त्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जवळपास पाऊणे दोन तास भाषण करत सरकारच्या कारभाराची चिरफाड केली. काही अपवाद वगळता सत्ताधारी बाकांवरुनही भाषणा दरम्यान विरोधाचा फारसा आवाज आला नाही. फडणवीस यांनी कोरोना, शेतकरी, कायदा सुव्यवस्था, पूजा चव्हाण प्रकरण, मेहबूब शेख प्रकरण, मेट्रो कारशेड अशा अनेक विषयांवर सरकारवर टीकेचा भडीमार केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या फेसबुक लाईव्हची खिल्ली उडवत त्यांना राज्यातील जनतेचा आवाज ऐकूच येत नाही असा टोमणाही मारला. आजच्या दिवसातली सभागृहातली स्पेस फडणवीस यांनी व्यापून टाकली.

राज्यपालांच्या अभिभाषणावर उद्या चर्चेचा दुसरा आणि शेवटचा दिवस आहे. भाजपतर्फे सुधीर मुनगंटीवार पुन्हा एकदा सरकारवर प्रहार करण्यासाठी भाषणाची जोरदार तयारी करत उतरत आहेत. तर हा सगळा हल्ला परतवून लावण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही तितक्याच आक्रमकपणे सभागृहात येतील अशी सगळ्यांनाच अपेक्षा आहे. त्यामुळे उद्या सभागृहात होणाऱ्या या शाब्दिक चकमकीकडे सगळ्यांचंच लक्ष असणार आहे.

First published:

Tags: BJP, Devendra Fadnavis, State budget session, Sudhir mungantivar, Uddhav Thackeray (Politician)