मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

मोठी बातमी : नवी मुंबईत राष्ट्रवादी-शिवसेनेच्या अडचणी वाढणार? काँग्रेसने घेतली आक्रमक भूमिका

मोठी बातमी : नवी मुंबईत राष्ट्रवादी-शिवसेनेच्या अडचणी वाढणार? काँग्रेसने घेतली आक्रमक भूमिका

Navi Mumbai Municipal Election : काँग्रेसने आक्रमक भूमिका घेत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे.

Navi Mumbai Municipal Election : काँग्रेसने आक्रमक भूमिका घेत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे.

Navi Mumbai Municipal Election : काँग्रेसने आक्रमक भूमिका घेत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे.

नवी मुंबई, 2 मार्च : नवी मुंबई महापालिका निवडणूक (Navi Mumbai Municipal Election) घोषित होण्याआधीच राज्यभर चर्चेचा विषय ठरली आहे. कारण राज्यातील सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. नवी मुंबईतील दिग्गज नेते गणेश नाईक (Ganesh Naik) यांनी राष्ट्रवादीतून भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर या निवडणुकीत भाजपचं पारडं जड झालं आहे. मात्र गणेश नाईक यांच्या वर्चस्वाला हादरा देण्यासाठी राष्ट्रवादी आणि शिवसेनेकडून जोरदार प्रयत्न केले जात आहे. परंतु अशा स्थितीतच काँग्रेसने आक्रमक भूमिका घेत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे.

या निवडणुकीत काँग्रेस स्वबळाची भूमिका घेण्याची शक्यता निर्माण झाली आहे. काँग्रेस पक्षाला मजबूत करण्यासाठी मुंबईप्रमाणे राज्यभरातील महापालिका निवडणुका स्वबळावर लढण्याचा मानस यावेळी काँग्रेस नेते नसीम खान यांनी व्यक्त केला. नवी मुंबईतील सर्व 111 प्रभागात आजपासून काँग्रेस स्वबळावर काम करणार असल्याचंही नसीम खान यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा - Gujrat local body election 2021: भाजपचा पुन्हा एकदा डंका; 'आप'ला ग्रामीण लॉटरी तर काँग्रेस मात्र पिछाडीवर

नसीम खान यांच्या या वक्तव्याने आगामी मनपा निवडणुकीत काँग्रेस महाविकास आघाडीतून बाहेर पडेल अशी शक्यता आता व्यक्त करण्यात येत आहे. नवी मुंबई महापालिका निवडणुकीत सर्व 111 प्रभागात काँग्रेसला नंबर एकचा पक्ष बनविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचा संकल्पही आजच्या बैठकीत पक्ष कार्यकर्त्यांकडून करण्यात आला.

नवी मुंबई निवडणुकीत गणेश नाईक यांची प्रतिष्ठा पणाला

2019 मध्ये गणेश नाईक यांनी राष्ट्रवादीची साथ सोडत कमळ हाती घेतलं. नाईक यांच्या भाजप प्रवेशानंतर राष्ट्रवादीच्या बहुतांश नगरसेवकांनीही पक्षांतर करण्याचा निर्णय घेतला. नाईक यांचं पक्ष सोडून जाणं राष्ट्रवादीच्या नेतृत्वाच्या जिव्हारी लागल्याचं दिसत आहे. कारण राष्ट्रवादीने या निवडणुकीत आपली संपूर्ण ताकद झोकून दिली आहे. राष्ट्रवादीचे आमदार आणि माथाडी कामगारांचे नेते अशी ओळख असलेले शशिकांत शिंदे हे गेल्या काही महिन्यांपासून शहरात तळ ठोकून आहेत.

दुसरीकडे, गणेश नाईक यांनीही आपला बालेकिल्ला अजिंक्य राखण्यासाठी कंबर कसली आहे. तर शिवसेनाही शहरात आपली ताकद राखण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्यामुळे ही निवडणूक मोठी रंजक ठरणार, यात अजिबातच शंका नाही.

First published:

Tags: Congress, Election