मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना मानदुखीचा त्रास, डॉक्टरांनी दिला शस्त्रक्रियेचा सल्ला

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना मानदुखीचा त्रास, डॉक्टरांनी दिला शस्त्रक्रियेचा सल्ला

सध्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर घरगुती उपचार सुरू आहेत. तब्येतीत सुधारणा देखील आहे. मात्र, पुन्हा एकदा मान आणि पाठदुखीचा त्रास होऊ नये

सध्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर घरगुती उपचार सुरू आहेत. तब्येतीत सुधारणा देखील आहे. मात्र, पुन्हा एकदा मान आणि पाठदुखीचा त्रास होऊ नये

सध्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर घरगुती उपचार सुरू आहेत. तब्येतीत सुधारणा देखील आहे. मात्र, पुन्हा एकदा मान आणि पाठदुखीचा त्रास होऊ नये

मुंबई, 09 नोव्हेंबर : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांना पाठीचा आणि मानदुखीचा त्रास (Back and neck pain) उद््भवला आहे. सध्या त्यांच्यावर घरीच उपचार सुरू आहे. पण, वरिष्ठ डॉक्टरांनी त्यांना छोट्या शस्त्रक्रियेचा पर्याय सुचवला आहे.

सोमवारी संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाचे भूमिपूजन पार पडले. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे कार्यक्रमाला हजर झाले होते. यावेळी मानेला दुखापत झाल्यामुळे गळ्याला पट्टा लावून उद्धव ठाकरे पाहण्यास मिळाले होते.

Anand Rathi चा 'या' मल्टिबॅगर स्टॉकमध्ये गुंतवणुकीचा सल्ला

पण मुख्यमंत्र्यांना गेले काही दिवस पाठीचं आणि मान दुखीचा त्रास होतोय. हा त्रास अधिक बळावू नये यासाठी HN रिलायन्स हॉस्पिटलमधील (HN Reliance Hospital mumbai) वरिष्ठ डॉक्टरांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना छोट्या शस्त्रक्रियेचा पर्याय सूचवला आहे. मात्र शस्रक्रिया करायची की नाही याचा निर्णय स्वत: उद्धव ठाकरे घेणार आहेत.

Corona Vaccine घेतल्यानंतर फळफळलं महिलेचं नशिब, काहीच क्षणात बनली करोडपती!

सध्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर घरगुती उपचार सुरू आहेत. तब्येतीत सुधारणा देखील आहे. मात्र, पुन्हा एकदा मान आणि पाठ दुखीचा त्रास होऊ नये यासाठी वरिष्ठ डॉक्टरांनी शस्त्रक्रियेचा पर्यायी सल्ला दिला आहे. पण शस्रक्रिया करायची की नाही याचा निर्णय उद्धव ठाकरे घेणार आहेत.

First published:
top videos