मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Anand Rathi चा 'या' मल्टिबॅगर स्टॉकमध्ये गुंतवणुकीचा सल्ला, यावर्षी शेअरमध्ये 145 टक्क्यांची वाढ

Anand Rathi चा 'या' मल्टिबॅगर स्टॉकमध्ये गुंतवणुकीचा सल्ला, यावर्षी शेअरमध्ये 145 टक्क्यांची वाढ

ब्रोकरेज हाऊस आनंदी राठी (Anand Rathi) यांना आता KPIT Technologies शेअरमध्ये आणखी वाढ अपेक्षित आहे. त्यामुळे या शेअरला त्यांनी BUY रेटिंग दिली आहे.

  • Published by:  Pravin Wakchoure

मुंबई, 9 नोव्हेंबर : शेअर बाजाराच गुंतवणुकीसाठी (Share Market Investment) चांगले शेअर शोधणे खरी तारेवरची कसरत असते. त्यात असे काही शेअर्स आहेत की त्यावर नजर शेअर बाजारातील तज्ज्ञांचीच पडते. अशाच KPIT Technologies शेअरबद्दल आज जाणून घेऊयात. KPIT Technologies ने सप्टेंबर तिमाहीत मजबूत निकाल नोंदवला. या कालावधीत कंपनीचा नफा गेल्या आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीच्या तुलनेत 27 कोटींवरून 65 कोटींवर पोहोचला आहे. KPIT Technologies चा स्टॉक मल्टीबॅगर असल्याचे सिद्ध झाले आहे आणि त्याने यावर्षी 145 टक्के रिटर्न दिले आहे.

ब्रोकरेज हाऊस आनंदी राठी (Anand Rathi) यांना आता या शेअरमध्ये आणखी वाढ अपेक्षित आहे. त्यामुळे या शेअरला त्यांनी BUY रेटिंग दिली आहे. तसेत 400 रुपयांची टार्गेट प्राईज देखील दिली आहे. कंपनीच्या महसुलात अपेक्षेप्रमाणे वाढ झाली असून भविष्यातही ती चांगली वाढेल अशी अपेक्षा असल्याचे आनंद राठीने सांगितलं.

दुसर्‍या तिमाहीत, अमेरिका, युरोप किंवा जपान जवळपास सर्वच रिजनमध्ये कंपनीच्या व्यवसायात तेजी आली आहे. कंपनीची टॉप 25 अकाऊंट वार्षिक आधारावर 20 टक्के दराने वाढत आहेत. EBITDA मार्जिन देखील 17.6 टक्के राहिला, जो अपेक्षेपेक्षा चांगला होता. पगारवाढ होऊनही मार्जिन चांगले राहिले आहे आणि आर्थिक वर्ष 2022 मध्ये 17.5 टक्के राहण्याची अपेक्षा आहे.

जुलै-सप्टेंबर तिमाहीत कंपनीचे उत्पन्न वार्षिक आधारावर 485.4 कोटी रुपयांवरून 590.8 कोटी रुपये झाले आहे. कंपनीने आर्थिक वर्ष 2022 साठी रेव्हेन्यू ग्रोथ आऊटलूक 18-20 टक्क्यांपर्यंत वाढवला आहे.

आनंद राठीचं म्हणणं आहे की, कंपनीची वाढ आणि मार्जिन त्याच्या लार्जकॅप समकक्ष कंपन्यांच्या बरोबरीने राहू शकतात. या शेअरमध्ये पुढे जाण्याची मोठी क्षमता आहे.

(Disclaimer:बाजारातील गुंतवणूक ही बाजाराच्या जोखमीच्या अधीन असते. गुंतवणूकदारांनी गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्यावा. News18Lokmat.com कोणालाही गुंतवणूक करण्याचा सल्ला देत नाही.)

First published:

Tags: Investment, Money, Share market