मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

Maharashtra Unlock : 'या' नियमांची पूर्तता केली तरच करता येणार लोकलने प्रवास; जाणून घ्या ते 3 नियम

Maharashtra Unlock : 'या' नियमांची पूर्तता केली तरच करता येणार लोकलने प्रवास; जाणून घ्या ते 3 नियम

 स्थानकांवरील पासच्या समस्येसाठी ऑफलाइन प्रणाली 11 ऑगस्ट 2021 पासून दररोज सकाळी 7 ते रात्री 11 या वेळेत कार्यान्वित होईल.

स्थानकांवरील पासच्या समस्येसाठी ऑफलाइन प्रणाली 11 ऑगस्ट 2021 पासून दररोज सकाळी 7 ते रात्री 11 या वेळेत कार्यान्वित होईल.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लोकल प्रवासाची नवी नियमावली जाहीर केली आहे.

  • Published by:  Meenal Gangurde

मुंबई, 8 ऑगस्ट : आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मुंबईकरांना चांगली बातमी दिली आहे. 15 ऑगस्टपासून मुंबई लोकल सुरू करणार असल्याचं यावेळी मुख्यमंत्री म्हणाले. मात्र लोकल सुरू करण्याची घोषणा केली असली तरी त्यामागे अनेक नियमावली असून त्याचे पालन केल्यास नागरिकांना लोकलने प्रवास करता येणार आहे. त्यामुळे अनेकांनी यावर निराशा व्यक्त केली आहे. (Chief Minister issues new rules for Mumbai local travelers)

लोकल बंद असल्यामुळे मध्यवर्गीयांना कार्यालयात जाणे-येणे कठीण जात आहे. त्यामुळे लोकल सुरू करावी अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांकडून केली जात आहे. मात्र मुख्यमंत्र्यांनी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भीती पाहता लोकलसाठी काही नियम व अटी लावल्या आहेत. कोरोनाची लाट अजून काही गेली नाही. मागील वर्षी गणेशोत्सव, दिवाळी आणि नवरात्र कोरोनाच्या लाटेत साजरे करावे  लागले. त्यानंतर दोन लाटा आल्या होत्या. लशीचा साठा हळूहळू वाढत आहे. पण, जोपर्यंत लशीचा साठा सुरळीत होत नाही, तोपर्यंत आपल्याला सावध भूमिका घ्यावी लागली.

हे ही वाचा-Mumbai Local : 15 ऑगस्टपासून मुंबईची लोकल सुरू, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

जाणून घ्या काय आहेत नवे नियम (new rules for traveling by Mumbai locals)

1 लशीचा दुसरा डोस घेऊन 14 दिवस झाले असतील तरच लोकलने प्रवास करता येणार

2 यासाठी मोबाइल अॅपच्या माध्यमातून प्रवासी रेल्वेचा पास डाऊनलोड करावा लागेल.

3 ज्यांच्याकडे स्मार्टफोन नाही ते शहरातील पालिकेची प्रभाग कार्यालये तसेच उपनगरीय रेल्वे स्थानकांवरून फोटो पासेस घेऊ शकतील.

4 लोकल प्रवासाच्या या पासेसवर क्यू आर कोड असतील जेणेकरून रेल्वे प्रशासनाला त्याची सत्यता पडताळता येईल.

या सहा जिल्ह्यांना अलर्ट

दरम्यान राज्यातील या सहा जिल्ह्यांना अलर्ट केलं आहे. या जिल्ह्यांमधील रुग्णसंख्या अद्यापही कमी झालेली नसल्याचं यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांनी काळजी घेणं गरजेचं असल्याचं त्यांनी सांगितलं.

First published:

Tags: Cm, Corona updates, Mumbai, Mumbai local, Udhav thackarey