Home /News /mumbai /

Mumbai Local : 15 ऑगस्टपासून मुंबईची लोकल सुरू, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

Mumbai Local : 15 ऑगस्टपासून मुंबईची लोकल सुरू, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून राज्यातील जनतेशी संवाद साधला. यावेळी लोकल सुरू करण्याबद्दल खुलासा केला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून राज्यातील जनतेशी संवाद साधला. यावेळी लोकल सुरू करण्याबद्दल खुलासा केला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून राज्यातील जनतेशी संवाद साधला. यावेळी लोकल सुरू करण्याबद्दल खुलासा केला आहे.

    मुंबई, 08 ऑगस्ट : मुंबईची लाईफलाईन असलेली लोकल (mumbai local) कधी सुरू होणार अशी चर्चा रंगली होती. अखेर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackery) यांनी 15 ऑगस्टपासून लोकल सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. कोरोना लशीचे 2 डोस घेतलेल्या नागरीकांना लोकलमधून प्रवास करता येणार आहे, असंही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून राज्यातील जनतेशी संवाद साधला. यावेळी लोकल सुरू करण्याबद्दल खुलासा केला आहे. मुंबईमध्ये लोकल प्रवास 15 ऑगस्टपासून करता येणार आहे. पहिल्या टप्प्यामध्ये ज्यांनी लशीचे दोन्ही डोस घेतले आहे. त्यांना १४ दिवसपूर्ण झाले आहे. त्यांना हा प्रवास करता येणार आहे. या सर्व नागरिकांसाठी एक अॅप तयार केला आहे, या अॅपवर नोंदणी करावी लागणार आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सांगितलं. तसंच,  कोविड काळामध्ये मुंबईतील उपनगरीय रेल्वेमधून सर्वसामान्य प्रवाशांना प्रवास करण्यासाठी निर्बंध टाकण्यात आले आहेत. यासंदर्भात अनेक प्रवासी संघटना तसेच नागरिकांनी वारंवार लोकल सेवा वापरण्यास परवानगी द्यावी अशी विनंती केली आहे.  आपणा सर्वास माहीतच आहे की अद्याप आपण दुसऱ्या लाटेतून देखील पूर्णपणे सावरलेलो नाही.  संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका देखील आहे.  केंद्र सरकारने देखील आपणास वारंवार याबाबत इशारा दिला आहे, असंही मुख्यमंत्री म्हणाले. मात्र तरीदेखील अर्थचक्र सुरु ठेवण्यासाठी काही निकष आणि निर्बंध लावून सर्वसामान्य प्रवाशांना प्रवाशांना लोकलचा प्रवास करण्यास आपण मान्यता देत आहोत. ज्या प्रवाशांनी लसीचे दोन्ही डोस घेतले असतील तसेच दुसरी लस घेऊन 14 दिवस झाले असतील त्यांना आपण 15 ऑगस्ट पासून लोकलमधून प्रवास करता येईल, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. 'ज्यांच्याकडे स्मार्टफोन आहेत असे प्रवासी मोबाईल अॅपच्या माध्यमातून रेल्वेचा पास डाऊनलोड करू शकतील. ज्यांच्याकडे स्मार्टफोन नाही, असे प्रवासी शहरातील पालिकेची प्रभाग कार्यालये तसंच उपनगरीय रेल्वे स्थानकांवरून फोटो पासेस घेऊ शकतील, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. 'सर्वात महत्वाचं म्हणजे, लोकल प्रवासाच्या या पासेसवर  क्यू आर कोड असतील जेणेकरून रेल्वे प्रशासनाला त्याची सत्यता पडताळता येईल मी आपणास विनंती करतो, की कुणीही अवैधरित्या, बेकायदेशीररित्या पासेस प्राप्त करून घेऊ नयेत. लसींचे दोन डोसेस घ्यावेत व प्रवास करावा' असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलं.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या