मुंबई 05 जुलै : जून महिन्यात गायब झालेल्या मान्सूनने (Monsoon Update) जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून मुंबईसह राज्यातील अनेक भागांत दमदार हजेरी लावली आहे. मुंबईत कालपासूनच पावसाची (Mumbai Rains Update) संततधार सुरु आहे. मुंबईत पावसाचा जोर आणखी वाढण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. आज मुसळधार पावसाच्या इशाऱ्यानंतर बीएमसी आणि आपत्ती व्यवस्थापन विभाग अलर्ट पॉईंटवर मोडवर आहेत.
Weather Update : पावसाच्या धास्तीने प्रसाशन सज्ज, राज्यात पुढचे 4 दिवस अतिमुसळधार पावसाचा alert
आज दुपारी 3 वाजून 53 मिनिटांनी समुद्रात 4.07 मीटर म्हणजेच तब्बल 13.35 फूट उंच लाटा समुद्रात उसळतील. या भरतीच्या काळात (BMC Warns of High Tide) मुसळधार पाऊस सुरू राहिल्यास, समुद्राचं पाणी ड्रेनेज लाइनमधून मुंबई शहर आणि उपनगरात पोहोचेल. ज्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी साचून वाहतूक कोंडीची परिस्थिती निर्माण होईल.
आज मंगळवार म्हणजेच कामकाजाचा दिवस आहे. अशा परिस्थितीत ऑफिसला जाणाऱ्यांचा आणि ऑफिसमधून घरी येण्याऱ्यांना या त्रासाला सामोरे जावं लागण्याची शक्यता आहे. मुंबई शहर 5 बेटांना जोडून तयार झालं आहे. अशा परिस्थितीत भरती-ओहोटीच्या वेळी समुद्राचं पाणी शहराच्या आत शिरतं आणि शहर बुडू लागतं.
Kolhapur Rain : धबधब्यात अंघोळीला गेले अन् 80 जण अडकले, कोल्हापूर जिल्ह्यात घडली थरारक घटना
याशिवाय मुंबईमध्ये वाहणारी मिठी नदी, पोईसर नदी, दहिसर नदी, आरे नदी (ज्या आता नाल्यात बदलल्या आहेत) यांच्या साफसफाईचं काम पूर्ण न केल्यामुळं त्याचा कचराही मोठ्या प्रमाणात शहरातील रस्त्यांवर पडला आहे. त्यामुळे ड्रेनेज लाईन चॉक अप होते आणि पाणी साचण्याचं प्रमाण वाढतं. ज्यामुळे अनेक ठिकाणी पाणी तुंबल्याचं पाहायला मिळतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Mumbai rain, Rain updates