मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /Weather Update : पावसाच्या धास्तीने प्रसाशन सज्ज, राज्यात पुढचे 4 दिवस अतिमुसळधार पावसाचा alert

Weather Update : पावसाच्या धास्तीने प्रसाशन सज्ज, राज्यात पुढचे 4 दिवस अतिमुसळधार पावसाचा alert

कोकण (Konkan heavy rain) वगळता राज्यात कमी झालेला पावसाचा (Maharashtra rain update) जोर पुन्हा वाढण्याची शक्यता आहे.

कोकण (Konkan heavy rain) वगळता राज्यात कमी झालेला पावसाचा (Maharashtra rain update) जोर पुन्हा वाढण्याची शक्यता आहे.

कोकण (Konkan heavy rain) वगळता राज्यात कमी झालेला पावसाचा (Maharashtra rain update) जोर पुन्हा वाढण्याची शक्यता आहे.

मुंबई, 05 जुलै : मागच्या कित्येक दिवसांपासून कोकण (Konkan heavy rain) वगळता राज्यात कमी झालेला पावसाचा (Maharashtra rain update) जोर पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. कालपासून दक्षिण कोकणात मुसळधार पावसाचा "ऑरेंज अलर्ट" (orange alert in Konkan) देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील घाटमाथ्यांवर जोरदार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. (imd alert heavy rain) दरम्यान  विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. तर मराठवाडा, विदर्भात विजांसह जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. (weather update)

तसेच दोन दिवसांपासून मुंबईसह कोकणात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. सोमवारी मध्यरात्रीनंतर मुंबई, ठाण्यात मुसळधार पाऊस (Heavy rains in Mumbai) कोसळण्याचा अंदाज वेधशाळेने वर्तविला होता. याप्रमाणेच या भागांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे सखल भागात पाणी साचलं आहे. मुसळधार पावसामुळे मुंबईतील सायन परिसरात पाणी साचल्याने वाहतुक विस्कळीत झाली होती. (Waterlogging in Sion area of Mumbai).

हे ही वाचा : सावधान! राज्यात सर्वत्र दमदार पावसाचा इशारा; नागपूरपासून रत्नागिरीपर्यंत NDRF ची पथके तैनात

मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, बीड, लातूर, जालना, परभणी आणि इतर अनेक भागांसह महाराष्ट्रातील अनेक भागात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. (काल दि.04) रोजी चिपळूण, रत्नागिरी येथे 5 NDRF च्या तुकड्या तैणात करण्यात आल्या आहेत. तसेच रायगड जिल्ह्यातील महाड आणि रायगड परिसरातही ऑरेंज अलर्ट देण्यात आल्याने त्या भागातही NDRF च्या तुकड्या तैणात करण्यात आल्या आहेत. मागच्या वर्षी झालेल्या पावसाचा अंदाज घेत नागरिकांना आतापासूनच आवाहन करण्यात येत आहे. प्रशासनाने खबरदारी म्हणून NDRF च्या मुंबईत 5 टीम, नागपूरमध्ये 1 टीम, चिपळूण, रत्नागिरीमध्ये 1 टीम आणि महाड रायगडमध्ये 1 टीम तैणात केल्या आहेत.

जोरदार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट)

कोकण : रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग. विदर्भ : चंद्रपूर.

जोरदार पावसाचा इशारा (यलो अलर्ट)

कोकण : ठाणे, मुंबई, पालघर. मध्य महाराष्ट्र : पुणे, सातारा, कोल्हापूर. मराठवाडा : औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड. विदर्भ : अमरावती, यवतमाळ, नागपूर.

विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट)

मराठवाडा : बीड, लातूर, उस्मानाबाद. विदर्भ : बुलडाणा, अकोला, वाशीम, वर्धा, भंडारा, गोंदिया, गडचिरोली.

हे ही वाचा : Kolhapur Rain : धबधब्यात अंघोळीला गेले अन् 80 जण अडकले, कोल्हापूर जिल्ह्यात घडली थरारक घटना

दरम्यान मागच्या 24 तासांत कोकण : रायगड : कर्जत 41, खालापूर 35, महाड 47, माथेरान 80, पनवेल 45 पोलापूर 41, रोहा 40, सुधागड 46, विदर्भ : रत्नागिरी : दापोली 37, रत्नागिरी 35, लांजा 35, सिंधुदुर्ग : दोडामार्ग 45, कुडाळ 38, मालवण 65. मुलदे (कृषी) 35, सावंतवाडी 33. मध्य महाराष्ट्र कोल्हापूर : गगनबावडा 49, राधानगरी ४६. नाशिक : हर्सल 35, इगतपुरी 54. पुणे : लोणावळा 33, वेल्हे 28. मराठवाडा : अर्धापूर 41, भोकर 38, धर्माबाद 45, हिमायत नगर 91, कंधार 34, किनवट 60, लोहा 75, माहूर 48, अकोला 26, बाळापूर 24. भंडारा : लाखंदूर 35, पवनी 51, साकोली 37. सातारा : महाबळेश्वर 36, पौड 23 मिमी पावसाची नोंद झाली.

First published:

Tags: Monsoon, Mumbai rain, Rain in kolhapur, Weather, Weather update, Weather warnings