मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /Kolhapur Rain : धबधब्यात अंघोळीला गेले अन् 80 जण अडकले, कोल्हापूर जिल्ह्यात घडली थरारक घटना

Kolhapur Rain : धबधब्यात अंघोळीला गेले अन् 80 जण अडकले, कोल्हापूर जिल्ह्यात घडली थरारक घटना

 पाऊस नसल्याने कोल्हापूर जिल्ह्यातील धबधबे (kolhapur district waterfall) सुरू झाले नव्हते. दोन दिवसांपासून सुरू झालेल्या पावसाने धबधबे सुरू झाले आहेत.

पाऊस नसल्याने कोल्हापूर जिल्ह्यातील धबधबे (kolhapur district waterfall) सुरू झाले नव्हते. दोन दिवसांपासून सुरू झालेल्या पावसाने धबधबे सुरू झाले आहेत.

पाऊस नसल्याने कोल्हापूर जिल्ह्यातील धबधबे (kolhapur district waterfall) सुरू झाले नव्हते. दोन दिवसांपासून सुरू झालेल्या पावसाने धबधबे सुरू झाले आहेत.

कोल्हापूर, 05 जुलै : मागच्या तीन वर्षांपासून कोल्हापूर जिल्ह्यात पावसाने (Kolhapur heavy rain) अनेक घटना घडल्या आहेत. गेला महिनाभर पाऊस नसल्याने कोल्हापूर जिल्ह्यातील धबधबे (kolhapur district waterfall) सुरू झाले नव्हते. दोन दिवसांपासून सुरू झालेल्या पावसाने धबधबे सुरू झाले आहेत. दरम्यान कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील (kolhapur district heavy rainfall shahuwadi tehsil) असणाऱ्या बर्की धबधबा पाहण्यासाठी जवळपास 80 पर्यटक गेले होते. यावेळी जिल्हात जोरदार पावसाने ओढे आणि नद्यांच्या पाणी पातळीत वेगाने वाढ झाली. यामध्ये शाहूवाडी तालुक्यातील ओढ्यावर जोरदार पाणी आल्याने प्रवासी अडकून पडल्याची घटना घडली. प्रवाशांच्या आणि ग्रामस्थांच्या प्रसंगावधानाने सगळ्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले.

कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील बर्की धबधबा पाहण्यासाठी काल (दि. 05) दुपारी कोल्हापूरातून 2 मिनीबस व 8 कार मधून अंदाजे 70- 80 पर्यटक गेले होते. परतीच्या प्रवासावेळी सायंकाळी 5 वाजता बर्की गावाजवळील ताफेरा ओढा तसेच कासारी नदीवरील पुलावर पाणी आल्याने सर्व प्रवासी अडकले होते. दोन्ही ठिकाणची पाणी पातळी ओसरल्यावर सर्व वाहने व प्रवासी सुखरुप बाहेर पडली आहेत.

हे ही वाचा : सावधान! राज्यात सर्वत्र दमदार पावसाचा इशारा; नागपूरपासून रत्नागिरीपर्यंत NDRF ची पथके तैनात

या प्रवाशांना धीर देण्यासाठी व त्यांच्या सोयीसाठी बर्की  ग्रामस्थ, तरुण मंडळाचे अध्यक्ष, गावकरी, रेशन दुकानदार व वनरक्षक त्यांच्या सोबत होते.अतिवृष्टी होत असताना पर्यटकांनी सुरक्षेचा उपाय म्हणून बर्की धबधब्यासह जिल्ह्यातील इतर सर्व धबधब्यांच्या ठिकाणी वर्षा सहलीला जाऊ नये, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहे.

बर्कीत अडकलेल्या पर्यटकांची सुटका

बर्की (ता. शाहूवाडी) येथील धबधबा पाहण्यासाठी कोल्हापुरातून दोन मिनी बस आणि आठ चारचाकींतून सुमारे 70 ते 80 पर्यटक गेले होते. दिवसभर सुरू असलेल्या जोरदार पावसाने परिसरातील ओढे, नाले तसेच नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली. सायंकाळी परत येताना बर्की गावाजवळील ताफेरा ओढा तसेच कासारी नदीवरील पुलावर पाणी आल्याने ही सर्व वाहने अडकून पडली होती. बर्की ग्रामस्थांसह तरुण मंडळाचे कार्यकर्ते, व्यापारी आणि वनरक्षक यांनी त्यांच्यासोबत थांबून धीर दिला. पाणी ओसरल्यानंतर सायंकाळी सात वाजता ही वाहने कोल्हापूरच्या दिशेने रवाना झाली.

हे ही वाचा : मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस; या भागात रस्ते तुंबल्याने वाहतुकीवर परिणाम

बर्की, सोनुर्ले धबधबा पर्यटकांसाठी बंद

पावसाचा जोर वाढल्याने बर्की, सोनुर्ले धबधब्यासह परिसरातील पाणी पातळीत वेगाने वाढ होत आहे. यामुळे काही दिवस पर्यटकांसाठी हे दोन धबधबे बंद करण्याचा निर्णय वन विभागाने घेतल्याचे आरएफओ रवींद्र सूर्यवंशी, वनरक्षक संजय पाटील यांनी सांगितले. दरम्यान, पावसाचा जोर वाढत असल्याने पर्यटकांनी वर्षा सहलीला जाऊ नये, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहे.

First published:
top videos

    Tags: Kolhapur, Monsoon, Rain flood, Rain in kolhapur, Water fall, Weather forecast