मुंबई, 28 जून : आज महाराष्ट्र विधानपरिषदेच्या चार जागांसाठी आज मतमोजणी सुरू झाली आहे. मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर व कोकण विभाग पदवीधर या तीनही जागांसाठीच्या निवडणुकांची मतमोजणी नेरूळ येथील सेक्टर २४ मधील आगरी कोळी संस्कृती भवन येथे होत आहे.
विधानपरिषदेच्या मुंबई पदवीधर, मुंबई शिक्षक,कोकण पदवीधर आणि नाशिक शिक्षक मतदार संघात सोमवारी मतदान झाले.
मुंबई पदवीधर मतदारसंघात ५३.२३टक्के, मुंबई शिक्षक मतदारसंघासाठी ८३.२६, कोकण पदवीधर मतदार संघात ७३.८९ तर नाशिक शिक्षक मतदार संघात ९२.३० टक्के मतदान झालं. यानंतर आता सर्व राजकीय पक्षांचं निकालाकडे कक्ष लागलं आहे.
मुंबई पदवीधर मतदारसंघ निवडणूक
विलास पोतनीस - शिवसेना
अमितकुमार मेहता - भाजप
राजेंद्र कोरडे - शेकाप, (काँग्रेस,राष्ट्रवादीचा पाठिंबा)
राजेंद्र बंडगर - स्वाभिमान पक्ष
मुंबई शिक्षक मतदारसंघ
अनिल देशमुख - भाजप
शिवाजी शेंडगे - शिवसेना
कोकण पदवीधर मतदारसंघ
निरंजन डावखरे - भाजप
नजीब मुल्ला - राष्ट्रवादी
संजय मोरे - शिवसेना
नाशिक शिक्षक मतदारसंघ
अनिकेत पाटील - भाजप
किशोर दराडे - शिवसेना
भाऊसाहेब कचरे - टीडीएफ
संदीप बेडसे - (काँग्रेस, राष्ट्रवादी पाठिंबा)
हेही वाचा...
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा