मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

धक्कादायक! कोरोना पॉझिटिव्ह सांगून क्वारंटाईन सेंटरमध्ये बोलावून तरुणीसोबत केलं भलतंच

धक्कादायक! कोरोना पॉझिटिव्ह सांगून क्वारंटाईन सेंटरमध्ये बोलावून तरुणीसोबत केलं भलतंच

मुंबईसह राज्यात कोरोना विषाणूचा कहर सुरू असताना एक मानवतेला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे.

मुंबईसह राज्यात कोरोना विषाणूचा कहर सुरू असताना एक मानवतेला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे.

मुंबईसह राज्यात कोरोना विषाणूचा कहर सुरू असताना एक मानवतेला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे.

मुंबई, 22 जून: मुंबईसह राज्यात कोरोना विषाणूचा कहर सुरू असताना एक मानवतेला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. अश्लील कृत्या करण्यात आलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे मुंबईतील मालाड परिसरातील (पश्चिम) एका क्वारंटाईन सेंटरमध्ये ही घटना घडली आहे. या प्रकरणी चारकोप पोलिसांत क्वारंटाईन सेंटरमधील कर्मचाऱ्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे.

हेही वाचा...डॉक्टरांच्या चुकीची शिक्षा मातेनं भोगली, 6 महिन्याच्या अर्भकाचा गर्भातच मृत्यू

पोलिसांनी पीडित तरुणीच्या तक्रारीची गंभीर दखल घेत आरोपीला ताब्यात घेतलं आहे. आरोपी बृहृमुंबई महापालिकेचा कर्मचारी आहे. आरोपीविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मालाडमधील (पश्चिम) एका क्वारंटाईन सेंटरमध्ये गेल्या मे महिन्यात एका कुटुंबाला क्वारंटाईन करण्यात आलं होतं. नंतर 30 मे रोजी सगळ्यांना घरी पाठवण्यात आलं होतं. मात्र, 13 जून रोजी आरोपीने संबंधित कुटुंबीयांना फोन करून तरुणी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं सांगितलं होतं. एवढंच नाही तर तिला क्वारंटाईन सेंटरमध्ये बोलावून घेतलं होतं.

तरुणी आपल्या वडिलांसोबत क्वारंटाईन सेंटरमध्ये पोहोचली असता. तेथील अमित तटकरे नामक तरुणाने तरुणीच्या खोलीत जाऊन तिचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह नसल्याचं सांगितलं. तिला दुसऱ्या दिवशी घरी जाता येईल असंही सांगितलं. त्याच दिवशी आरोपी अमित तटकरे यानं तरुणीसोबत अश्लिल कृत्य केलं. पोलिस या प्रकरणी तपास करत आहेत.

हेही वाचा...बापरे! मुंबईत पावसाळ्यात कोरोनाचे रुग्ण वाढणार, आयुक्तांनी दिला इशारा

यापूर्वीही घडली होती अशीच घटना..

गेल्या महिन्यात उत्तराखंडमध्येही अशीच घटना समोर आली होती. एका पोलिस कॉन्स्टेबलनं नवविवाहितेवर बलात्काराचा प्रयत्न केला होता. उधमसिंह नगरमधील किच्छा विधानसभा क्षेत्रातील पुलभट्टा भागातील क्वारंटाईन सेंटरमध्ये ही घटना घडली होती. या घटनेमुळे चांगलीच खळबळ उडाली होती. नंतर आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला तडकाफडकी पोलिस सेवेतून निलंबित करण्यात आलं होतं.

First published:

Tags: Corona, Corona virus, Corona virus india