मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

डॉक्टरांच्या चुकीची शिक्षा मातेनं भोगली, 6 महिन्याच्या अर्भकाचा गर्भातच मृत्यू

डॉक्टरांच्या चुकीची शिक्षा मातेनं भोगली, 6 महिन्याच्या अर्भकाचा गर्भातच मृत्यू

या प्रकरणात महिलेने डॉक्टरांवर गंभीर आरोप केले आहे.

या प्रकरणात महिलेने डॉक्टरांवर गंभीर आरोप केले आहे.

या प्रकरणात महिलेने डॉक्टरांवर गंभीर आरोप केले आहे.

बीड, 22 जून : राज्यात सध्या कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. अशात सर्व आरोग्य सेवा रुग्णांची मदत करण्यात व्यस्त आहे. पण बीडमध्ये डॉक्टरांच्याच निष्काळजीपणामुळे सहा महिन्याच्या अर्भकाचा पोटातच मृत्यु झाल्याची घटना घडली आहे. डॉक्टरांना वारंवार सांगूनदेखील उपचार न केल्यामुळे एका आईवर आपलं बाळ गमावण्याची वेळ आली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात महिलेने डॉक्टरांवर गंभीर आरोप केले आहे. 'डॉक्टरांनी दुर्लक्ष केलं त्यामुळं माझं बाळ दगावलं माझ्या जीवाला धोका आहे' असा आरोप बाळाची आई शबाना शेख यांनी केला आहे. त्यांच्यावर परळी इथल्या रुग्णलयात उपचार सुरू आहेत. शबाना यांच्या नातेवाईकांनी यासंदर्भात परळी शहर पोलीस ठाण्यात डॉक्टरांविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी ठिया केला होता. पण पोलिसांच्या आश्वासनानंतर नातेवाईक शांत झाले गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. लॉकडाऊनमध्ये जोडप्यानं घरी सुरू केलं सेक्स रॅकेट, एका रुमचं मिळायचं इतकं भाडं मिळालेल्या माहितीनुसार, परळी शहरातील मिलिंदनगर इथल्या रहिवाशी 38 वर्षीय शबाना जमीर शेख या शहरातील श्री गजानन हॉस्पिटलमध्ये गरोदरपणातील उपचार घेत होत्या. पोटात दुखत असल्याने वारंवार डॉक्टरकडे जाऊन तपासणी केली. गेली आठ दिवस हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असतानादेखील डॉक्टरांनी व्यवस्थित उपचार केला नाही. उलट पित्त आहे असं सांगून टाळाटाळ केली. यामुळं माझं बाळ पोटातच दगावलं असं शबाना यांचं म्हणणं आहे. पिपंरी चिंचवड हादरलं! दोन दिवस मित्राला डिझेलनं झाळलं, तुकडे करून फेकलं नदीत दरम्यान, पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाची नोंद घेतली असून डॉक्टरांशी यासंदर्भात विचारणा केली असता त्यांनी कोणतंही उत्तर देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे पोलीस आता पुढील तपास करत असल्याची माहिती देण्यात आली आहे. खरंतर, घरात बाळ येणार या बातमीमुळे शेख कुटुंबात आनंदाचं वातावरण होतं. पण बाळाच्या अशा जाण्यामुळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्यामुळे डॉक्टरांवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी कुटुंबियांकडून करण्यात आली आहे. आधी कुपोषण आता अंधश्रद्धेचा कळस, पोटफुगीमुळे चिमुकल्यांना दिले लोखंडी सळीचे चटके संपादन - रेणुका धायबर
First published:

पुढील बातम्या