जाहिरात
मराठी बातम्या / मुंबई / ठाकरेंना शिंदे सरकारचा आणखी एक धक्का! बुलेट ट्रेन संदर्भात मोठी बातमी हाती

ठाकरेंना शिंदे सरकारचा आणखी एक धक्का! बुलेट ट्रेन संदर्भात मोठी बातमी हाती

ठाकरेंना शिंदे सरकारचा आणखी एक धक्का! बुलेट ट्रेन संदर्भात मोठी बातमी हाती

महाराष्ट्रात गेल्या अडीच वर्षात रखडलं बुलेट ट्रेन प्रकल्पा आता सुसाट धावणार आहे. शिंदे-फडणवीस सरकार लवकरच उर्वरित कामांना मंजुरी देणार असल्याची माहिती मिळाली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 12 जुलै : राज्यात सत्तांतर झाल्यानंतर आलेलं शिंदे सरकार आता ठाकरे सरकारला धक्क्यावर धक्के देत आहे. ठाकरे सरकारच्या अनेक प्रकल्पांना स्थगिती दिल्यानंतर आता शिवसेनेचा विरोध असलेल्या प्रकल्पांना हवा दिली जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं सरकार आता बुलेट ट्रेन प्रकल्पाला वेग देण्याचं काम करत असल्याचे पाहायला मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ड्रीम प्रोजेक्ट असणारा मुंबई अहमदाबाद हाय बुलेट ट्रेन प्रकल्प (Bullet Train Project) गेल्या काही दिवसांपासून संथ गतीने पुढे जात होता. मात्र, आता भाजपने समर्थन दिलेलं सरकार सत्तेवर आल्यामुळे हा प्रकल्प वेग पकडू लागला आहे. बुलेट ट्रेनला शिंदे सरकारची ताकद शिंदे-फडणवीस सरकारने ठाकरे सरकारला अजून एक दे धक्का दिला आहे. ठाकरे सरकारच्या काळात रखडलेला बुलेट ट्रेन प्रकल्प आता जोमानं सुरू होणार आहे. बुलेट ट्रेन संदर्भातील सर्व रखडलेल्या कामांना अंतिम मिळणार मंजुरी लवकरचं मिळणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून अंतिम मंजुरी मिळताच बुलेट ट्रेन प्रकल्प सुसाट धावणार आहे. बुलेट ट्रेनसंदर्भातील सर्व कामांना मंजुरी देण्याची फाईल अंतीम मंजुरीसाठी CMO कडे पाठवण्यात आली आहे. जमीन अधिग्रहणावर भर या प्रकल्पासाठी महाराष्ट्रात सुमारे 150 हेक्टर क्षेत्राचं अधिग्रहण करणं गरजेचं आहे. अद्याप या कामाने वेग घेतलेला नाही. केंद्र सरकारच्या समन्वयाने शिंदे सरकारच्या कार्यकाळात या कामाला वेग येण्याची चिन्हे आहेत. या प्रकल्पासाठी 352 किलोमीटर काम गुजरात राज्यात होणार असून दादरा आणि नगर-हवेली परिसरातील कामांनाही आता वेग आला आहे. राजकारणातील मोठी बातमी; भाजपच्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवार दौपद्री मुर्मू यांना उद्धव ठाकरेंचा पाठिंबा ठाकरे सरकारच्या काळात कामे रखडली या योजनेशी संबंधित सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 2019 साली उद्धव ठाकरे सरकार सत्तेत आल्यानंतर या प्रकल्पाचा अंदाजित वेळ वाढवण्यात आला होता. सुरुवातीला हा प्रकल्प 2023 साली पूर्ण होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला होता. मात्र, त्यानंतर तो 2026 करण्यात आला होता. तीन वर्ष या प्रकल्पाला उशीर होईल, असं गृहित धरण्यात आलं होतं. महाराष्ट्रातील कामांची वाट न पाहता गुजरातमध्ये ठरल्याप्रमाणे कामे सुरु करण्यात यावीत, असे निर्देश खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले होते. मात्र, आता भाजपच्या पाठिंब्याचं सरकार महाराष्ट्रात आल्यामुळे दोन्ही राज्यातील कामे समान वेगाने सुरू राहतील, अशी अपेक्षा अधिकारी व्यक्त करत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात