Home /News /mumbai /

...मग हा निर्लज्जपणा कुणाचा म्हणायचा? फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांना टोला

...मग हा निर्लज्जपणा कुणाचा म्हणायचा? फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांना टोला

'सत्तेत नसताना शेतकऱ्यांचा बांधावर जाऊन 25 ते 50 हजार रुपये देण्याचे वचन दिले होते. पण सत्तेत आल्यावर आपल्याच वचनाचा विसर पडला'

    मुंबई, 10 मार्च : अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या (Maharashtra Budget 2021) अखेरच्या दिवशीही महाविकास आघाडी सरकार (MVA Goverment) आणि भाजपमध्ये (BJP) आरोप प्रत्यारोपाच्या फैऱ्या झडल्यात. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन 50 हजार आश्वासन देणारे सत्तेत आल्यानंतर वचन पाळत नाही. बंद दाराआड वचन देणाऱ्यांना निर्लज्ज म्हणालात तर जाहीर वचन देऊन विसर पडणाऱ्यांना काय म्हणायचं? असा सवाल करत भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर (CM Uddhav Thackery) निशाणा साधला. अर्थसंकल्पीय अधिवेशनात अर्थसंकल्पावर आपली बाजू मांडत देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. 'बजेटमध्ये कोणताही धाडसी निर्णय नाही. वीजेबद्दल सत्ता पक्षांतल्या लोकांनाही तोंड कसं द्यायचं हा प्रश्न पडला आहे. किमान किमान समान कार्यक्रमाचं तरी पाहा. किमान सहा सात गोष्टी ज्या किमान समान कार्यक्रमात सांगितल्या होत्या, त्या नाही. आरोग्य विभागाचं बजेट अडीच हजार कोटींनी अधिक हवं होतं' असं फडणवीस म्हणाले. 'तान्हाजी' आणि 'चुलत्या'फेम कैलास वाघमारेला कुणी पाठवलं इमोशनल पत्र 'सत्तेत नसताना शेतकऱ्यांचा बांधावर जाऊन 25 ते 50 हजार रुपये देण्याचे वचन दिले होते. पण सत्तेत आल्यावर आपल्याच वचनाचा विसर पडला. बंद दरवाज्या आड वचन देणाऱ्यांना निर्लज्ज म्हणाला होता, तर जाहीर देणाऱ्यांना काय म्हणायचं?' असा सवाल करत फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावला. 'मुख्यमंत्री जलसंवर्धन योजना सुरू केली. माथा ते पायथा तत्वाचा वापर नाही. पाणलोट क्षेत्रात कामं आहेत. ठेकेदारांना फायदा देणारी योजना आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांनी जलयुक्त शिवाराबद्दल कॅगच्या अहवालाचा संदर्भ दिला. पण यातला एकही शेरा भ्रष्टाचाराचा नाही.  कॅगने आपले शेरे आणि खुलासा मागवणारे पत्र पाठवले. राज्य सरकारने अहवाल जाहीर केल्यावर मग त्यावरच्या आक्षेपांना उत्तर दिले जाणूनूबुजून सरकारने नंतर उत्तरं दिले, जेणेकरुन शेरे तसेच राहावे. राजकीय हेतुने हे झाले आहे', अशी टीकाही फडणवीसांनी केली. रोहित, युवराजच्याही पूर्वीच्या टीम इंडियाच्या ओरिजनल Sixer King ला ओळखले का? '१३ हजार कोटी रुपये पैसे जास्त केंद्र सरकारकडून आले आहेत. पण हा अर्थसंकल्प राज्याचा की मुंबईचा आहे, असा प्रश्न पडला आहे. ज्या काही घोषणा केल्या आहे, त्या मुंबईशी संबंधीत आहे. कोस्टल रोडच्या परवानग्या आम्ही मिळवल्या सांडपाण्याचा प्रकल्प याचा राज्याशी काय संबंध? असा टोलाही फडणवीसांनी लगावला. 'सरकारने शेतकऱ्यांची कोणती कर्जमुक्ती केली आहे. गेल्या कर्जमुक्तीत 55 लाख जणांना फायदा झाला यंदा 31 लाख जणांना ५७ टक्के शेतकरी पीक कर्जापासून दूर अनेक बॅंका बंद आहेत. शेतक-यांचे कोरोना काळात मोठं नुकसान झाले आहे, असंही फडणवीस म्हणाले.
    Published by:sachin Salve
    First published:

    Tags: Uddhav tahckeray

    पुढील बातम्या