मुंबई, 26 जुलै: मुंबईतील (Mumbai) बोरिवली भागात एका तरुणानं आपल्या सख्ख्या मेहुण्यावर (Brother in law) चाकू आणि दारूच्या बाटलीनं (Stabbed with wine bottle) सपासप वार करत त्याची हत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. आरोपीनं आपल्या बायकोसमोरच मेहुण्याला रक्ताच्या थारोळ्यात पाडलं आहे. याप्रकरणी बोरिवली परिसरातील महाराष्ट्र हाऊसिंग बोर्ड (एमएचबी) पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल (FIR lodged) करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी अवघ्या दोन तासांत फरार आरोपी भावोजीला बेड्या ठोकल्या (Accused arrest) आहेत. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. संदीप राजपूत असं हत्या झालेल्या 24 वर्षीय मेहुण्याचं नाव आहे. याप्रकरणी एमएचबी पोलिसांनी 28 वर्षीय आरोपी भावोजी भरत मकवाना याला बेड्या ठोकल्या आहेत. आरोपी भरत आणि त्याची बायको म्हणजेच संदीपची बहीण यांच्यात घरगुती कारणावरुन वाद झाला होता. बहिणी आणि भावोजी यांच्या सुरू असलेल्या वादात संदीपनं मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला होता. हेही वाचा- पत्नीसोबत ते एक कृत्य करणं भोवलं; युवकाची सासरच्यांकडून धुलाई, घातला चपलांचा हार यामुळे आरोपी भरतनं आपल्या पत्नीवरील राग आपल्या मेहुण्यावर काढला आहे. संतापाच्या भरात आरोपीनं चाकू आणि दारूच्या बाटलीनं मेहुणे संदीप राजपूत यांच्यावर सपासप वार केले आहेत. आरोपीनं जीवघेणा हल्ला करत संदीपला रक्ताच्या थारोळ्यात पाडलं आणि घटनास्थळावरून पोबारा केला आहे. हेही वाचा- सासरच्यांनी विष पाजलं अन्…, मृत्यूपूर्वी विवाहितेनं सांगितली व्यथा याप्रकरणी बोरिवली येथील एमएचबी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी अवघ्या दोन तासांत आरोपी भरत मकवाना याला मीरा रोड परिसरातून अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास महाराष्ट्र हाऊसिंग बोर्ड (एमएचबी) पोलीस करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.