• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • पत्नीसोबत ते एक कृत्य करणं भोवलं; युवकाची सासरच्यांनी केली धुलाई, गळ्यात घातला चपलांचा हार

पत्नीसोबत ते एक कृत्य करणं भोवलं; युवकाची सासरच्यांनी केली धुलाई, गळ्यात घातला चपलांचा हार

काही लोकांनी या युवकाला साखळीनं बांधून धू धू धुतलं. इतकंच नाही तर यानंतर त्या व्यक्तीचं मुंडनही केलं.

 • Share this:
  कोलकाता 26 जुलै : पत्नीला तिहेरी तलाक (Triple Talaq) देणं एका व्यक्तीला चांगलंच महागात पडलं आहे. काही लोकांनी या व्यक्तीला साखळीनं बांधून धू धू धुतलं. इतकंच नाही तर यानंतर त्या व्यक्तीचं मुंडनही केलं. ही घटना पश्चिम बंगालच्या (West Bengal) उत्तर दिनाजपुरमधून समोर आली आहे. घटनेचा व्हिडिओदेखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल (Viral Video) झाला आहे. व्हिडिओचा तपास केला असता असं समोर आलं, की हा व्हिडिओ गोआलपोखर भागातील आहे. या व्हिडिओमध्ये ज्या व्यक्तीचा धुलाई होत आहे त्याच्यावर आपल्या पत्नीला तिहेरी तलाक दिल्याचा आरोप आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गावातील लोकांनी या व्यक्तीच्या सासरच्या मंडळींसोबत बैठक घेत यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, हा युवक बैठकीत सहभागी झाला नाही. यानंतर त्याच्या सासरच्या मंडळींनी त्याला शिक्षा देण्याचा निर्णय घेतला. याच कारणामुळे आधी त्याला झाडाला बांधून मारहाण करण्यात आली आणि यानंतर त्याचं मुंडन करण्यात आलं. स्थानिक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमारे 2 वर्षांपूर्वी चारघरिया येथील रहिवासी असलेल्या फिरोजाचं लग्न ड्रायवरचं काम करणाऱ्या तौफीक आलम नावाच्या एका व्यक्तीसोबत झालं. मात्र, लग्नानंतर काही काळातच दोघांमध्ये वाद होऊ लागले. यानंतर वाद वाढल्यानं अनेकदा तौफीकनं आपल्या पत्नीला मारहाण केली. मात्र, ती सर्व सहन करत राहिली. जेव्हा तौफीकनं तिला तिहेरी तलाक दिला तेव्हा तिनं आपल्या माहेरी फोन केला. यानंतर तिच्या कुटुंबीयांनी तौफीकची धुलाई केली. मुलीच्या कुटुंबीयांनी तौफीकच्या गळ्यात चपलांचा हारही घातला आणि त्याला जमिनीवर बसवलं. यादरम्यान कोणीतरी या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ शूट केला, जो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तौफीकच्या कुटुंबीयांचा असा आरोप आहे, की या घटनेनंतर त्याचा काहीही तपास नाही. पोलिसांनीही त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र तो कुठेही सापडला नाही.
  Published by:Kiran Pharate
  First published: