Home /News /crime /

सासरच्यांनी जबरदस्तीनं विष पाजलं; गुप्तांगात मिरची टाकण्याचा प्रयत्न, मृत्यूपूर्वी विवाहितेनं सांगितली व्यथा

सासरच्यांनी जबरदस्तीनं विष पाजलं; गुप्तांगात मिरची टाकण्याचा प्रयत्न, मृत्यूपूर्वी विवाहितेनं सांगितली व्यथा

प्रियाला इतकी मारहाण करण्यात आली की तिला रुग्णालयात दाखल करावं लागलं. रुग्णालयात जीवन आणि मरणाची लढाई लढत असलेल्या प्रियानं आपला एक व्हिडिओ बनवला

    जयपूर 26 जुलै: सासरच्या लोकांनी विष पाजून सुनेची हत्या केल्याची (Mother in Law Killed Woman) धक्कादायक घटना समोर आली आहे. सुनेनं मृत्यूपूर्वी रुग्णालयातूनच व्हिडिओ (Video) बनवून सासरकडच्या लोकांवर गंभीर आरोप केले आहेत. तिचं असं म्हणणं आहे, की हुंड्यासाठी (Dowry) तिला मारहाण केली गेली. अडीच महिन्यांपूर्वीच तिचं लग्न (Marriage) झालं होतं. ही घटना राजस्थानच्या (Rajasthan) भीलवाडा जिल्ह्यातील आहे. 26 एप्रिल रोजी भीलवाडा पोलिसांत कार्यरत हेड कॉन्स्टेबल भैरू लाल यांची मुलगी प्रिया हिचं लग्न विक्रमसोबत झालं होतं. लग्नानंतर दोन-चार दिवसातच प्रियाची सासू तिला हुंड्यासाठी त्रास देऊ लागली. सासरकडचे लोक तिला मारहाण करू लागले. प्रियाला इतकी मारहाण करण्यात आली की तिला रुग्णालयात दाखल करावं लागलं. रुग्णालयात जीवन आणि मरणाची लढाई लढत असलेल्या प्रियानं आपल्या एक व्हिडिओ बनवला आणि सासरकडच्यांनी दिलेल्या त्रासाची कथा सांगितली. अल्पवयीन मुलीची प्रसूती आणि बाळांची बोली; रुग्णालयात भरला नवजात बाळांचा बाजार तिनं सांगितलं,की सासरकडचे लोक आधी तिला जंगलात घेऊन गेले, तिचे कपडे काढले आणि यानंतर तिच्या गुप्तांगात मिरची टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिनं स्वतःची सुटका करत तिथून पळ काढला. मृत्यूआधी प्रियानं सांगितलं, की सासरच्यांनी माझ्यावर बसून मला मारहाण केली. ते माझ्याकडे 6 लाख रुपये मागत आहेत. मात्र, माझ्याकडे त्यांना देण्यासाठी सहा हजार रुपयेही नाहीत. सासू आणि सासरकडच्या लोकांनी मला जबरदस्ती विष पाजलं आहे. 6 वर्षांपासून 'तो' एका खोलीत होता बंद; करायचा 'हे' संतापजनक काम विष पिण्याआधी तिनं सांगितलं, की माझ्या मृत्यूला माझी सासू, सासरे आणि नणंद कारणीभूत आहे. त्यांनी रात्री मला मारहाण केली आणि माझे कपडेही फाडले. प्रियाचे वडील भैरू लाल यांचं असं म्हणणं आहे, की लग्नात त्यांनी सोनं-चांदीचे दागिने, फ्रिज, टीव्ही, कूलर, कपाट. डबल बेड आणि भांड्यांसह सर्व वस्तू दिल्या होत्या. मात्र, प्रियाची सासू मला 6 लाख रुपये मागू लागली. पैसे द्या आणि मुलीचा संसार चालू द्या असं तिनं म्हटलं. मात्र, या गोष्टीला नकार देताच त्यांनी प्रियाला मारहाण करण्यास सुरुवात केली. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून प्रियाच्या मृतदेहाचं शवविच्छेदनही करण्यात आलं आहे.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Crime news, Poison

    पुढील बातम्या