जाहिरात
मराठी बातम्या / मुंबई / BREAKING : कराचीमध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांनी ताज हॉटेलवर हल्ला करण्याची दिली धमकी

BREAKING : कराचीमध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांनी ताज हॉटेलवर हल्ला करण्याची दिली धमकी

BREAKING : कराचीमध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांनी ताज हॉटेलवर हल्ला करण्याची दिली धमकी

सोमवारी पाकिस्तानातील कराची स्टॉक एक्सचेंजमध्ये दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. याच दहशतवाद्यांनी ताज हॉटेलमध्ये फोन करून दहशतवादी हल्ला करण्याची धमकी दिली.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 30 जून : मुंबईची शान असलेल्या ताज हॉटेलवर दहशतवादी हल्ला करण्याची धमकी देण्यात आली आहे. पाकिस्तानमधून आलेल्या एका निनावी फोनमधून ताज हॉटेलवर दहशतवादी हल्ला करून बॉम्बने उडवून देऊ अशी धमकी दिली आहे. या धमकीनंतर ताज हॉटेलच्या सुरक्षेत पोलिसांनी वाढ केली आहे. काल मध्यरात्री ताज हॉटेलच्या व्यवस्थपकांना एका निनावी फोन आला होता. या फोनमधून ताजवर पुन्हा एकदा दहशतवादी हल्ला करण्याची धमकी देण्यात आली. हा फोन पाकिस्तानमधून आल्याचं सांगण्यात आलं आहे. जम्मू-कश्मीरच्या अनंतनागमध्ये पुन्हा चकमक, 2 दहशतवाद्यांचा खात्मा धक्कादायक म्हणजे, सोमवारी पाकिस्तानातील कराची स्टॉक एक्सचेंजमध्ये दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. याच दहशतवाद्यांनी ताज हॉटेलमध्ये फोन करून दहशतवादी हल्ला करण्याची धमकी दिली. ताज व्यवस्थापकांनी याबद्दल मुंबई पोलिसांना याची माहिती पुरवली. त्यानंतर ताज हॉटेलच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली असून परिसरात पोलिसांचा  बंदोबस्तही वाढ करण्यात आली आहे. तुम्ही 1962 सालात का रांगताय? पवारांच्या वक्तव्यानंतर ‘सामना’तून शहांना टोला 2008 साली पाकिस्तानातून आलेल्या दहशतवाद्यांनी मुंबईवर भीषण हल्ला केला होता.  त्यानंतर दहशतवाद्यांनी ताज हॉटेलमध्ये लपून बसले होते. दहशतवाद्यांनी ताजमध्ये थांबलेल्या अनेक ग्राहकांवर बेछुट गोळीबार केला होता आणि हॉटेलचे अतोनात नुकसान केले होते. संपादन - सचिन साळवे

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात