जम्मू-कश्मीरच्या अनंतनागमध्ये पुन्हा चकमक, 2 दहशतवाद्यांचा सुरक्षा दलांनी केला खात्मा

जम्मू-कश्मीरच्या अनंतनागमध्ये पुन्हा चकमक, 2 दहशतवाद्यांचा सुरक्षा दलांनी केला खात्मा

दहशतवाद्यांना आपली शस्त्र फेकण्याच्या सूचना देण्यात आल्या पण दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला.

  • Share this:

श्रीनगर, 30 जून : जम्मू काश्मीरच्या (Jammu-Kashmir) अनंतनाग जिल्ह्यात बिजबेहारामध्ये सुरक्षा दलाच्या (Indian security force) दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत 2 दहशवतादी (Terrorists) ठार झाले आहेत. अजूनही सुरक्षा दलाने हा संपूर्ण परिसर घेरला असल्याची माहिती समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चकमकीत ठार झालेल्या दहशतवाद्यांनी तीन दिवसांपूर्वी अनंतनागमध्ये पोलीस पथकावर गोळीबार केला होता. या घटनेत सीआरपीएफचा जवान शहीद झाले होते तर एका पाच वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला होता.

आतापर्यंत आलेल्या माहितीनुसार, काही दहशवादी बिजबेहरामध्ये लपून बसले असल्याची गोपनीय माहिती सुरक्षा दलाच्या हाती लागली.

कोरोनाची ही 3 नवीन लक्षणं धोकादायक आहेत, त्रास झाला तर आधी करा COVID-19 टेस्ट

गेल्या अनेक दिवसांपासून दहशतवादी या भागात फिरत होते आणि ते त्याच्या सहकाऱ्यांसह मोठा कट रचन्याचा प्लान करत होते. माहितीच्या आधारे सुरक्षा दलांनी स्थानिक पोलीस आणि सीआरपीएफच्या पथकासह संयुक्त पथक तयार केलं आणि वाघमा परिसराला घेराव घातला.

यावेळी दहशतवाद्यांना आपली शस्त्र फेकण्याच्या सूचना देण्यात आल्या पण दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. दोन्ही बाजूंकडून झालेल्या या गोळीबारात दोन दहशतवादी ठार झाले. सोमवारी अशाच चकमकीत तीन दहशतवादी मारले गेले. या दहशतवाद्यांच्या हत्येनंतर डोडा जिल्हा दहशतवादमुक्त घोषित करण्यात आला आहे.

हिंदी महासागरात चीनच्या हालचालींवर लक्ष, भारताला 'या' देशांच्या दलांकडूनही मदत

दरम्यान, गेल्या काही दिवसांआधीही जम्मू-काश्मीरच्या (Jammu-Kashmir)त्राल सेक्टरमध्ये भारतीय सुरक्षा दलांशी (Indian security force) झालेल्या चकमकीत तीन दहशतवाद्यांचा (Terrorist) खात्मा करण्यात आला होता. दहशतवाद्यांशी सुरू असलेली चकमक संपली असून भारतीय सुरक्षा दलाने आजूबाजूचा परिसर घेरला आणि शोध मोहीम सुरू केली. खरंतर या वर्षी अनेक दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. गेल्या 19 दिवसांत 35 दहशतवादी ठार झाले आहेत.

संपादन - रेणुका धायबर

First published: June 30, 2020, 8:47 AM IST

ताज्या बातम्या