मुंबई, 06 ऑगस्ट : राज्यात अनलॉक (maharashtra unlcok) नियमावली नुकतीच राज्य सरकारने (mva government) जाहीर केली आहे. त्यात राज्यातील अकरा जिल्ह्यांमधील व्यतिरिक्त इतर ठिकाणी रात्री दहा वाजेपर्यंत सर्व दैनंदिन व्यवहारांना मंजुरी देण्यात आली आहे. आता राज्य सरकार पुढील आठवड्यामध्ये शाळा (school) सुरू करावेत का याबाबत विचार करत आहे.
राज्य सरकारच्या शालेय शिक्षण विभाग (Department of School Education ) पुढील आठवड्यात वरिष्ठ अधिकाऱ्यांना बरोबर एक बैठक आयोजन केले आहे. या बैठकीमध्ये ज्या ठिकाणी रुग्ण संख्या खूप कमी झाले आहे, अशा ठिकाणी उच्च माध्यमिक शाळा वर्ग सुरू करावेत का? किंवाट इयत्ता नववी, दहावी या इयत्तेतील विद्यार्थी यांचे शालेय वर्ग सुरू करावेत का याबाबत चाचपणी करणार आहे.
सोमवारपासून ठाणे जिल्ह्यातील हॉटेल-बार बेमुदत बंद, पार्सल सेवाही नाही
राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये रुग्ण संख्या आटोक्यात आली असल्याने तिथली परिस्थिती देखील सुधारत आहे, अशा ठिकाणी काही प्रमाणात शाळा सुरू कराव्यात असा विचार शालेय शिक्षण विभागाचा आहे.
त्या अनुषंगाने पुढील आठवड्यामध्ये राज्यातील शालेय शिक्षण विभाग याबाबत बैठक घेणार आहे, त्यानंतर न शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून याबाबत अंतिम निर्णय घेणार असल्याचं शालेय शिक्षण विभागातील उच्चस्तरीय सूत्रांनी माहिती दिली आहे.
ग्रामीण भागात 8 वी ते 12 वीचे वर्ग सुरू करण्याबाबत नियमावली जाहीर
दरम्यान, ग्रामीण भागात कोविडमुक्त ग्रामपंचायतीचा (Covid free grampanchayat) अंतर्गत असणारे इयत्ता आठवी ते बारावीचे वर्ग सुरू (Class 8 to Class 12) करण्याबाबत पालकांशी चर्चा करून ठराव करावा यासाठी ग्रामपंचायत स्तरावर एक समिती गठित केली आहे. त्याचे अध्यक्षपद ग्रामपंचायतीचे सरपंच असतील. त्यामध्ये तलाठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष वैद्यकीय शिक्षणाधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिकारी ग्रामसेवक मुख्याध्यापक केंद्रप्रमुख यांची समिती याबाबत निर्णय घेईल.
ना पुरावा ना साक्षीदार; मुंबईतील विवाहितेच्या हत्येचं उलगडलं गूढ; तिघांना अटक
शाळा सुरू करण्यापूर्वी कमीत कमी एक महिना संबंधित गावात कोविड रुग्ण आढळला नसावा, शिक्षकांचे लसीकरण करण्यात आले असावे, जर ते केले नसेल तर पहिल्यांदा लसीकरण करावे विद्यार्थ्यांच्या पालकांना गर्दी काढण्यासाठी शाळा परिसरात येऊन देऊ नये. विद्यार्थी बाधित झाल्याचे आढळल्यास तात्काळ शाळा बंद करावी आणि शाळा निर्जंतुकीकरण करण्याची जबाबदारी मुख्याध्यापकांनी घ्यावी विद्यार्थ्यांचे विलगीकरण करावे व वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्याने उपचार सुरू करावेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: School