ठाणे, 6 ऑगस्ट : कोरोनाच्या नवीन नियमावली (maharashtra unlock) विरोधात ठाण्यातील बार अँड रेस्टॉरंट ऑनर्स असोसिएशन आक्रमक झाले आहेत. काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने ब्रेक दे चेन अंतर्गत नवी नियमावली जाहीर केली होती. यामध्ये काही जिल्ह्यातील दुकानांना वेळ वाढवून देण्यात आला आहे. मात्र हॉटेल-बारच्या नियमांमध्ये कोणतीही शिथिलता करण्यात आलेली नाही. त्यावर हॉटेल आणि बार असोसिएशनने संताप व्यक्त केला आहे. (maharashtra unlock Hotel bar in Thane district closed indefinitely from Monday no parcel service)
बार आणि रेस्टॉरंटची वेळ वाढवून द्या, या मागणीसाठी ठाणे जिल्ह्यातील सर्व बार आणि रेस्टॉरंट बेमुदत बंद ठेवण्यात येणार आहेत. ठाण्यातील हजारो बार आणि रेस्टॉरंट यावेळी बंद राहणार आहेत. यामध्ये स्वीगी, झोमॅटोच्या माध्यमातून होणारी पार्सल सेवा (no parcel service) देखील ठेवणार बंद ठेवण्यात येणार आहे. नवीन नियमावलीमध्ये आमच्यावर अन्याय झाला असल्याची भावना बार मालकांनी व्यक्त केली आहे. ठाण्यात बार आणि रेस्टॉरंट वगळता इतर दुकान रात्री 10 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र बार रेस्टॉरंट फक्त ४ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची मुभा दिल्याने बार मालकांनी बेमुदत हॉटेल बार बंद ठेवत आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यामुळे यावर सरकारची प्रतिक्रिया काय असणार आहे हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
कुटुंबाशिवाय राहणारे किंवा हॉटेलमध्ये खानावळ लावलेल्या नागरिकांना याचा फटका सहन करावा लागण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा-Maharashtra unlock: 22 जिल्ह्यांनी घेतला मोकळा श्वास; मुंबई, ठाणे unlock कधी?
लोकलबाबतही अद्याप निर्णय नाही
राज्य सरकारकडून ११ जिल्हे वगळता अनलॅाकचे नियम शिथिल Restrictions relaxed) करण्यात आले आहे.. या संदर्भात नवी नियमावली (New guidelines) जाहीर केली आहे. पण मुंबईची लोकल सुरू करण्याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. लोकल सुरू करण्याचा निर्णय आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या कोर्टात टोलवण्यात आला आहे. त्यामुळे लोकल सुरू करण्याबद्दल वेगळी घोषणा होण्याची शक्यता आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.