मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IND vs SL : धक्कादायक! टीम इंडियाचे 9 खेळाडू T20 सीरिजमधून बाहेर, 5 नेट खेळाडूंना संधी

IND vs SL : धक्कादायक! टीम इंडियाचे 9 खेळाडू T20 सीरिजमधून बाहेर, 5 नेट खेळाडूंना संधी

भारत-श्रीलंका (India vs Sri Lanka) यांच्यातल्या दुसऱ्या टी-20 सामन्यावरचं संकट दूर झालं आहे. माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार बुधवारी 8 वाजता दुसरी टी-20 मॅच सुरू होणार आहे.

कोलंबो, 28 जुलै : भारत-श्रीलंका (India vs Sri Lanka) यांच्यातल्या दुसऱ्या टी-20 सामन्यावरचं संकट दूर झालं आहे. माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार बुधवारी 8 वाजता दुसरी टी-20 मॅच सुरू होणार आहे. मंगळवारी कृणाल पांड्याची (Krunal Pandya) कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे हा सामना स्थगित करण्यात आला होता. आता आज हा सामना होणार असला तरी कृणाल पांड्यासह 9 खेळाडू टी-20 सीरिजमधून बाहेर झाले आहेत, तर 5 नेट बॉलर्सना टीम इंडियामध्ये संधी मिळाली आहे. इशान पोरेल (Ishan Porel), संदीप वॉरियर (Sandeep Warrior), साई किशोर (Sai Kishore), अर्शदीप सिंग (Arshdeep Singh) आणि सिमरजीत सिंग (Simarjeet Singh) यांना नेट बॉलर म्हणून श्रीलंकेला नेण्यात आलं होतं, पण आता त्यांना भारतीय टीममध्ये स्थान मिळालं आहे.

क्रिकबझने दिलेल्या वृत्तानुसार दुसऱ्या टी-20 मध्ये शिखर धवनच (Shikhar Dhawan) टीम इंडियाचं नेतृत्व करेल, पण 9 खेळाडू बाहेर झाले आहे. या 9 खेळाडूंमध्ये कोणाचं नाव आहे, याबाबत अजून कोणतीही माहिती मिळालेली नाही.

एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार पृथ्वी शॉ, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, कृष्णप्पा गौतम, मनिष पांडे, इशान किशन आता टी-20 सीरिज खेळणार नाहीत. शिखर धवनही टी-20 सीरिजमधून बाहेर झाला आहे आणि भुवनेश्वर कुमार टीमचं नेतृत्व करेल, असं वृत्त होतं, पण शिखर धवन बुधवार आणि गुरुवारी होणाऱ्या सामन्यासाठी मैदानात उतरेल, असं स्पष्ट करण्यात आलं आहे.

First published:
top videos

    Tags: India Vs Sri lanka, T20 cricket, Team india