जाहिरात
मराठी बातम्या / मुंबई / BREAKING : 'अनिल देशमुख हाजीर हो', अखेर सीबीआयने बोलावलं चौकशीला!

BREAKING : 'अनिल देशमुख हाजीर हो', अखेर सीबीआयने बोलावलं चौकशीला!

सलग दुसऱ्या दिवशी Anil Deshmukh यांच्या मालमत्तांवर Income Tax ची धाड

सलग दुसऱ्या दिवशी Anil Deshmukh यांच्या मालमत्तांवर Income Tax ची धाड

परमबीर सिंग यांच्या पत्रामुळे अडचणीत सापडलेले राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अखेर सीबीआयच्या चौकशीला सामोरं जावं लागणार आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 12 एप्रिल : माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग  (parambir singh) यांच्या पत्रामुळे अडचणीत सापडलेले राष्ट्रवादीचे (NCP) नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना अखेर सीबीआयच्या (CBI) चौकशीला सामोरं जावं लागणार आहे. सीबीआयने अनिल देशमुख यांना 14 एप्रिल रोजी चौकशीला बोलावले आहे. परमबीर सिंग यांनी मुंबईतील बार, रेस्टारंट आणि पबचालकांकडून 100 कोटींच्या वसुलीचा गंभीर आरोप केला होता. या प्रकरणी हायकोर्टाने सीबीआय चौकशीला परवानगी दिली. त्यानंतर सीबीआयने पोलीस अधिकारी वकील जयश्री पाटील, पोलीस अधिकारी सचिन वाझे आणि परमबीर सिंग यांची चौकशी केली. त्यानंतर आता अनिल देशमुख यांचा नंबर लागला आहे. अनिल देशमुख यांना 14 एप्रिल रोजी चौकशीला बोलावण्यात आले आहे. दत्ता सतत दारू का पितो?; ‘रात्रीस खेळ चाले’मध्ये येणार नवा ट्विस्ट त्याआधी  सीबीआयने रविवारी अनिल देशमुख यांच्या दोन सचिवांना चौकशी करता बोलावले होते. असं सांगितलं जातंय की, अनिल देशमुख यांचे हे दोन्ही सचिव मुंबई पोलीस दलातील पोलीस उपायुक्त राजू भुजबळ, एसीपी संजय पाटील आणि एपीआय सचिन वाझे या तिघांना वारंवार भेटायचे. एवढंच नाही तर बार, हुक्का पार्लर सारख्या आस्थपनांकडून पैसे गोळ्या करण्या संदर्भात या दोन्ही सचिवांनी या तिन्ही पोलिसांशी अनेकदा चर्चा केली. खात्यात पैसे नसले, तरीही ही बॅंक देईल 3 लाखांचा ओव्हरड्राफ्ट; फक्त आहे एकच अट त्यामुळे नेमके अनिल देशमुख यांचे पीए या पोलिसांना वारंवार का भेटायचे? तसंच यांच्यात काय चर्चा होत होती? माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपानुसार तसंच सचिन वाझेंच्या लेटर बॉम्बमध्ये असलेल्या उल्लेखानुसार, या सचिवांनी नेमकी काय भुमिका बजावली, याची शाहनिशा सीबीआय या दोघांकडून करत आहे. सीबीआयने आतापर्यंत तक्रारदार जयश्री पाटील, प्रतिवादी परमबीर सिंग, एसीपी संजय पाटील, सचिन वाझे, आणि हॉ़टेल व्यावसायिक महेश शेट्टी यांची चौकशी केली. तर आज सीबीआयने अनिल देशमुख यांच्या दोन सचिवांची चौकशी केल्याने पुढचा नंबर अनिल देशमुख यांचा लागला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात