नवी दिल्ली, 12 एप्रिल : नोकरदार वर्गाला आकर्षित करण्यासाठी बॅंका अनेक स्किम्स, ऑफर्स सातत्यानं आणत असतात. एक खात्रीशीर ग्राहक म्हणून हा वर्ग आपल्या बॅंकेतील व्यवहारांशी जोडला जावा, म्हणून बॅंका अनेक ऑफर्स या वर्गाला देत असतात. नोकरदार वर्गासाठी देशातील दुसऱ्या क्रमाकांची सर्वात मोठी बॅंक असलेल्या पंजाब नॅशनल बॅंकेने एक खास ऑफर आणली आहे. या ऑफरनुसार, जरी तुमच्या खात्यात पैसे नसले, तरी बॅंक तुम्हाला लाखो रुपये देऊ शकणार आहे. मात्र या ऑफरचा फायदा घेण्यासाठी तुम्हाला या बॅंकेत माय सॅलरी अकाऊंट (My Salary Account) उघडावे लागणार आहे. हे अकाऊंट उघडल्यामुळे तुम्हाला वैयक्तिक अपघात विमा (Personal Accident Insurance) तसंच ओव्हरड्राफ्ट (Overdraft) आणि स्वीपची सुविधा मिळणार आहे.
पीएनबी माय सॅलरी अकाउंट उघडल्यास ग्राहकांना अनेक सुविधा मिळतात. खातेधारकांना 3 लाखांपर्यंतच्या ओव्हरड्राफ्ट सुविधेबरोबरच 20 लाखांचा अपघात विमाही मिळतो. हे अकाउंट केंद्र, राज्य सरकार, पीएसयू, शासकीय-निमशासकीय, कॉर्पोरेशन, एमएनसीज, प्रसिध्द इन्स्टिटयूशन्स, कॉर्पोरेट आणि शिक्षण संस्थांमध्ये काम करणारे कर्मचारी सुरू करू शकतात. कॉन्ट्रक्ट बेसिस (Contract Basis) किंवा कंत्राटी पध्दतीनं काम करणारे कर्मचारी हे अकांऊट सुरू करण्यास अपात्र आहेत.
3 लाख रुपयांच्या ओव्हर ड्राफ्टची सुविधा -
टीव्ही 9च्या वृत्तानुसार, पीएनबी माय सॅलरी अकाऊंट (PNB My Salary Account) उघडणाऱ्या खातेदारास ओव्हरड्राफ्टची सुविधा मिळते. सिल्व्हर कॅटेगरीतील खातेधारकांना 50,000 रुपये, गोल्ड कॅटेगरीतील खातेधारकांना 1,50,000, प्रिमियम कॅटेगरीतील खातेधारकांना 2,25,000 रुपये, तर प्लॅटीनम कॅटेगरीतील खातेधारकांना 3 लाख रुपयांपर्यंतची ओव्हरड्राफ्ट सुविधा दिली जाते. या योजनेतून खाते उघडणाऱ्या खातेदाराला स्वीपची सुविधा देखील मिळते.
सिल्व्हर कॅटेगरी अंतर्गत रुपे क्लासिक/प्लॅटिनम कार्ड (Rupay Classic-Platinum Card) मिळेल. यासाठी वार्षिक चार्ज देखील लागू केला जातो. गोल्ड, प्रिमियम आणि प्लॅटिनम कॅटेगरीतील खातेदारांना रुपे प्लॅटिनम कार्ड दिलं जातं. यावर कोणताही चार्ज लागू केला जात नाही.
झीरो बॅलन्स अकाउंट सुरू करू शकता -
पीएनबी माय सॅलरी अकाऊंटमध्ये 4 प्रकार आहेत. सिल्व्हर, गोल्ड, प्रिमियम आणि प्लॅटिनम. पगारानुसार ही 4 प्रकारची वर्गवारी करण्यात आली आहे. 10,000 ते 25,000 रुपये पगार असणाऱ्यांसाठी सिल्व्हर, 25001 ते 75,000 रुपये पगार असणाऱ्यांसाठी गोल्ड, 75,001 ते 1,50,000 रुपये पगार असणाऱ्यांसाठी प्रिमियम आणि 1,50,001 रुपयांवर पगार असणाऱ्या ग्राहकांसाठी प्लॅटिनम कॅटेगरी असणार आहे. हे अकाउंट झिरो बॅलन्सपासून सुरू करता येऊ शकतं. या अकाऊंटमध्ये किमान बॅलन्स (Minimum Balance) ठेवणं जरुरी नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.