Home /News /mumbai /

BREAKING : मुंबईतील वरळीमध्ये इमारतीची लिफ्ट कोसळली, 4 जणांचा मृत्यू

BREAKING : मुंबईतील वरळीमध्ये इमारतीची लिफ्ट कोसळली, 4 जणांचा मृत्यू

या दुर्घटनेत आतापर्यंत 4 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर अजूनही 6 जण आतमध्ये अडकल्याची माहिती समोर आली आहे.

    मुंबई, 25 जुलै : राज्यभरात जोरदार पावसामुळे ठिकठिकाणी दरडी कोसळल्यामुळे दुर्घटना घडत आहे. मुंबईतील वरळी (worli) भागात बांधकाम सुरू असलेल्या एका इमारतीत मोठी दुर्घटना घडली आहे. इमारतीची लिफ्ट कोसळून (building lift collapse) 4 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वरळी भागात बांधकाम सुरू असलेल्या एका इमारतीत संध्याकाळच्या सुमारास लिफ्ट कोसळली.अंबिका बिल्डर्स शंकरराव पदपथ मार्ग 118 आणि 119 बीडीडी चाळ, हनुमान गल्लीत ही घटना घडली आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत 4 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर अजूनही 6 जण आतमध्ये अडकल्याची माहिती समोर आली आहे. जखमींना तातडीने केईएम हॉस्पिटल आणि नायर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. गोव्याहून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या प्रवासी ट्रेनवर दरड कोसळली; भयावह दुर्घटना घटनेची माहिती मिळताच अग्नीशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून मदतकार्य सुरू आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी दिलेल्या माहितीनुसार, या इमारतीत पार्किंगचे बांधकाम सुरू होते. याच दरम्यान लिफ्ट कोसळली. यात दुर्घटनेत सापडून 4 जणांचा मृत्यू झाला अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. बचावकार्य सुरू आहे. 6 जण आत अडकले असून त्यांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. Video: शिल्पा शेट्टीला चाहत्यांचं समर्थन; घरी फुलं पाठवून दिला धीर अचानक झालेल्या या दुर्घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. बीडीडी चाळ परिसर हा दाटीवाटीचा आहे. या दुर्घटनेत 4 जणांचा मृत्यू झाल्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.
    Published by:sachin Salve
    First published:

    Tags: Worli

    पुढील बातम्या