जाहिरात
मराठी बातम्या / मुंबई / गोव्याहून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या प्रवासी ट्रेनवर दरड कोसळली; भयावह दुर्घटनेचा VIDEO आला समोर

गोव्याहून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या प्रवासी ट्रेनवर दरड कोसळली; भयावह दुर्घटनेचा VIDEO आला समोर

गोव्याहून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या प्रवासी ट्रेनवर दरड कोसळली; भयावह दुर्घटनेचा VIDEO आला समोर

महाराष्ट्रात ठिकठिकाणी दरड कोसळल्यामुळे अनेकांना जीवाला मुकावं लागलं आहे. दरम्यान गोव्यातही एक दुर्घटना झाली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 24 जुलै : देशातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा सामना करावा लागत आहे. दरम्यान महाराष्ट्रात अनेक ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना समोर आल्या आहेत. दुसरीकडे कर्नाटकातील मंगळुरूहून मुंबईला जाणाऱ्या एका प्रवासी ट्रेनवर शुक्रवारी दरड कोसळल्याची घटना समोर आली आहे. ही घटना गोव्यामध्ये झाली आहे. ज्या घटनेचा एक व्हिडीओ समोर आला आहे. (A passenger train from Mangalore in Karnataka to Mumbai landslide in goa on Friday) स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार ही ट्रेल 01134 मंगळुरू जंक्शन - सीएसटी टर्मिनस एक्सप्रेस स्पेशल आहे. वशिष्ठ नदीतील पाण्याची पातळी वाढल्यामुळे मडगाव-लोंडा-मिराज होत डायवर्ट करण्यात आलं होतं. द हिंदू वृत्तपत्रानुसार दूधसागर-सोनॉलिम खंडवर इंजन आणि पहिल्या जनरल डब्यासह ट्रेन ट्रॅकवरुन खाली उतरली होती. सुदैवाने या दुर्घटनेत एकही प्रवासी जखमी झाला नाही. मिळालेल्या माहितीनुसार, ज्या कोचवर दरड कोसळली त्यातील प्रवाशांना अन्य डब्यांमध्ये हलविण्यात आले आहे. आणि ट्रेन पुढे पाठविण्यात आली आहे.

जाहिरात

सातत्याने होणाऱ्या पावसानंतर दक्षिण पश्चिम रेल्वेच्या हुबळ मंडलच्या घाट खंडमध्ये दोन ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना समोर आल्या आहेत. पहिला दूधसागर आणि सोनॉलिम स्टेशनमध्ये आणि दुसरं कारनजोल आणि दूधसागर स्टेशनदरम्यान घडली आहे. हे ही वाचा- Weather Forecast: आज पुण्यात मुसळधार पावसाची शक्यता; कशी असेल कोकणातील स्थिती? प्रभावित झालेल्या अन्य ट्रेनमध्ये 02780 हजरत निजामुद्दीन-वास्को द गामा एक्सप्रेस स्पेशल विशेष ट्रेन असून जी बुधवारी दिल्लीतील हजरत निजामुद्दीन येथून सुटली होती आणि लोंडा ते वास्को द गामा दरम्यान अंशतः रद्द करण्यात आली. या व्यतिरिक्त ट्रेन क्रमांक 08048 वास्को द गामा-हावडा एक्सप्रेस स्पेशल, ट्रेन क्रमांक 07420 वास्को द गामा-तिरुपती एक्स्प्रेस विशेष आणि ट्रेन क्रमांक 07420/07022 वास्को द गामा-तिरुपती हैदराबाद एक्सप्रेस विशेष रद्द करण्यात आली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात