अभिनेत्रीनं केली पोलीस तक्रार; राज कुंद्रामुळे मिळत होती जीवे मारण्याची धमकी शिल्पा शेट्टीच्या घराबाहेर चाहत्यांची गर्दी असल्याचं या व्हिडिओमध्ये दिसून येत आहे. यासोबतच तिच्या घराबाहेर पोलीसही तैनात असलेले दिसून येत आहेत. यातच एक चाहता शिल्पासाठी पुष्पगुच्छ घेऊन उभा आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून, कित्येक नेटिझन्स या चाहत्याचं कौतुक करत आहेत. तसंच, कित्येक नेटिझन्स या चाहत्याची टरही उडवताना दिसून येत आहेत. अश्लील व्हिडिओ बनवल्याप्रकरणी राज कुंद्राला अटक (Raj Kundra Arrest) केल्यानंतर गेल्या शुक्रवारी मुंबई पोलिसांचं एक पथक शिल्पा शेट्टीच्या घरी पोहोचलं होतं. पोलीस या प्रकरणी शिल्पा शेट्टीचीही चौकशी करत आहेत. शुक्रवारी तिची सहा तास चौकशी करण्यात आली. तसंच, या प्रकरणी त्यांच्या जुहूमधल्या बंगल्याची झडतीही घेण्यात आली होती. दरम्यान, याप्रकरणी मुख्य आरोपी असलेल्या राज कुंद्रा याचे ‘उमेश कामत’ (Umesh Kamat) नावाच्या व्यक्तीसोबतचे चॅट्स पोलिसांना मिळाले आहेत. तो उमेश कामत कुंद्राचा माजी पीए होता. चॅट्समध्ये पैशांच्या व्यवहाराबाबत बोलणी झाली होती. यामुळे उमेश कामत असं नाव असलेला प्रसिद्ध मराठी अभिनेत्याला मात्र विनाकारण त्रास सहन करावा लागत आहे. राज कुंद्रा याच्याशी आपला कोणताही संबंध नसून, त्याच्यासोबत बोलणारी उमेश कामत नावाची दुसरीच व्यक्ती असल्याचा खुलासा या अभिनेत्याने केला आहे. कोणतीही शहानिशा न करता बातम्यांमध्ये आपला फोटो वापरणाऱ्यांविरुद्ध अब्रूनुकसानीचा दावा ठोकणार असल्याचं अभिनेता उमेश कामतने सांगितलं आहे.View this post on Instagram
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Raj kundra, Shilpa shetty