• Home
 • »
 • News
 • »
 • mumbai
 • »
 • BREAKING : मुंबईत बॉम्बस्फोट घडवणार, पोलिसांना निनावी कॉल; यंत्रणा हायअलर्टवर

BREAKING : मुंबईत बॉम्बस्फोट घडवणार, पोलिसांना निनावी कॉल; यंत्रणा हायअलर्टवर

'सर्व एजन्सींना कळविण्यात आले आहे. आम्ही या प्रकरणाची चौकशी करत आहोत. घाबरण्याची किंवा काळजी करण्याची गरज नाही'

'सर्व एजन्सींना कळविण्यात आले आहे. आम्ही या प्रकरणाची चौकशी करत आहोत. घाबरण्याची किंवा काळजी करण्याची गरज नाही'

'सर्व एजन्सींना कळविण्यात आले आहे. आम्ही या प्रकरणाची चौकशी करत आहोत. घाबरण्याची किंवा काळजी करण्याची गरज नाही'

 • Share this:
  मुंबई, 13 नोव्हेंबर : त्रिपुरामध्ये कथित हिंसाचाराच्या घटनेमुळे मालेगाव, नांदेड, अमरावती बंदला हिंसक वळण मिळाले. ही घटना ताजी असताना आता मुंबईमध्ये (Bomb blast ) बॉम्बस्फोट घडवून आणणार असल्याचा धमकीचा फोन कॉल (Threatening phone) रेल्वे पोलिसांना (railway police) आल्याची माहिती समोर आली आहे. हा फोन कॉल कुणी आणि कुठून केला याचा तपास पोलीस करत आहे. 'मुंबईतील संभाव्य बॉम्ब हल्ल्याची माहिती आज वांद्रे आरपीएसकडून दूरध्वनीवरून प्राप्त झाली आहे. कॉलरशी संपर्क साधण्यात आला आहे, अशी माहिती रेल्वे पोलीस आयुक्त कैसर खालीद यांनी दिली. रोहितला काम करू द्या, तुम्ही गप्प गुमान बसा' अजितदादांनी भाजप नेत्याला फटकारले तसंच, सध्याची परिस्थिती पाहता शहरात सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. सर्व एजन्सींना कळविण्यात आले आहे. आम्ही या प्रकरणाची चौकशी करत आहोत. घाबरण्याची किंवा काळजी करण्याची गरज नाही, असंही खालीद यांनी स्पष्ट केलं. अमरावतीमध्ये परिस्थिती नियंत्रणात दरम्यान, अमरावती शहरात आज भाजपने बोलावलेल्या बंद दरम्यान मोठ्या प्रमाणात  जाळपोळ, तोडफोडीच्या घटना घडल्या. जवळपास सकाळी साडे 9 ते 1 पर्यंत मोठ्या प्रमाणात ही तोडफोड जाळपोळ सुरू होती. पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी आज दुपारपासून नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. काही नागरिकांची सुद्धा भेट घेतली, जिल्ह्याचे वातावरण शांत व्हावे यासाठी पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी  सर्वपक्षीय बैठक अमरावती येथील बचत भवनात रात्री पार पडली. यवतमाळमधील अशोक पाल हत्याकांडाचे गुढ अखेर उलगडले, धक्कादायक कारण समोर या बैठकीत सुलभा खोडके, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संजय खोडके, माजी आमदा वीरेंद्र जगताप, प्रभारी पोलीस आयुक्त संदीप पाटील मुस्लिम समुदायातील धर्मगुरू, नेते या बैठकीला उपस्थित होते. शहरात आता शांतता असून परिस्थितीत नियंत्रणात आहे.
  Published by:sachin Salve
  First published: