Home /News /mumbai /

BREAKING : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल

BREAKING : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीला राज ठाकरे गैरहजर आहे. त्यांना तातडीने लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल केलं..

    मुंबई, 10 एप्रिल : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray admitted ) यांना पाठीचा त्रास होत असल्यामुळे मुंबईतील लीलावती हॉस्पिटलमध्ये (Lilavati hospital mumbai ) दाखल करण्यात आले आहे. लवकरच त्यांच्यावर एक छोटीशी शस्त्रक्रिया पार पडणार आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना मध्यंतरी मनगटाला दुखापत झाली होती. त्यानंतर आता पाठीचा त्रास उद्भवला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीला राज ठाकरे गैरहजर आहे. राज यांना तातडीने लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. अमृता फडणवीसांचा नवा PHOTO: म्हणतात, 'सिर्फ कुछ दाग अच्छे लगते है!' मिळालेल्या माहितीप्रमाणे, राज यांना पाठीचा त्रास होत आहे. त्यांना मणक्याच्या त्रास जाणवत आहे. त्यामुळे त्यांच्यावर छोटीशी  शस्त्रक्रिया होणार आहे. राज यांची प्रकृती उत्तम असून उद्या उद्या रविवारीच त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात येईल, अशी माहिती शर्मिला ठाकरे यांनी दिली. जानेवारी महिन्यात  राज ठाकरे यांना टेनिस खेळताना त्यांच्या हाताला दुखापत झाली  होती. त्यांच्या डाव्या हाताला ही दुखापत झाली होती. ही दुखापत फार मोठी नसली तर हातावर सुज आल्याने  तातडीनं हिंदुजा हॉस्पिटलमध्ये यावर उपचार घेतले होते लोकांचा उद्रेक टाळण्यासाठी नियोजन करावं - देवेंद्र फडणीस यापूर्वी राज ठाकरे यांना अशाप्रकारची दुखापत झाली होती. त्यावेळी त्यांच्या उजव्या हाताच्या कोपऱ्याला टेनिस एल्बोचा त्रास झाला होता. त्यावेळी त्यांनी हाताला सपोर्टर लावला होता. गेल्या वर्षीच्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी राज ठाकरे यांच्या हाताला लावलेल्या सपोर्टरनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या