मुंबई, 10 एप्रिल : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis FB post) या नेहमीच सोशल मीडियातून सक्रिय असतात आणि त्यांच्या नवनवीन पोस्ट बातम्यांचाही विषय होता. शुक्रवारी त्यांनी शेअर केलेल्या या फोटोची चर्चा होती. खरं तर आपल्या वाढदिवसाच्या निमित्त शुभेच्छा (Amruta Fadnavis birthday celebration) देणाऱ्यांचे अमृता फडणवीस यांनी आभार मानले आहेत. त्यासाठीच हा फोटो शेअर केला. आभार मानताना अमृता फडणवीस यांनी पोस्ट केलेल्या फोटोने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. त्याबरोबर 'सिर्फ कुछ दाग अच्छे लगते है!' अशी पोस्ट अमृता फडणवीस यांनी केली आहे.
अमृता फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्यावर सोशल मीडियासह विविध माध्यमांमधून शुभेच्छांचा वर्षाव झाला. अमृता फडणवीस सोशल मीडियावर अत्यंत अॅक्टिव्ह असून त्या विविध पोस्टद्वारे अनेक विषयांवर अगदी परखडपणे भाष्य करत त्यांचे मत मांडत असतात. त्यामुळं अनेकदा त्यांच्या सोशल मीडिया पोस्टची चर्चा होत असते. पण आता अमृता फडणवीस यांनी सोशल मीडियावर त्यांना शुभेच्छा देणाऱ्यांचे आभार मानण्यासाठी केलेल्या पोस्टचीही चर्चा होतेय. अमृता यांनी त्यांच्या बर्थडे सेलिब्रेशनचा फोटो पोस्ट करत खास कमेंट करून सर्वांचे आभार मानले आहेत.
Thank you so much for all your lovely birthday wishes !
सिर्फ कुछ दाग अच्छे लगते है !
Posted by Amruta Fadnavis on Saturday, April 10, 2021
या पोस्टमध्ये अमृता यांच्या चेहऱ्याला केक लावलेला असून त्याचा फोटो पोस्ट करतानाच अमृता यांनी सिर्फ कुछ दाग अच्छे लगते है! अशा प्रकारचं वक्तव्य त्याबरोबर केले आहे. त्याचबरोबर वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देणाऱ्या सर्वांचे आभारही त्यांनी मानले आहेत. अमृता फडणवीस यांनी केलेल्या सिर्फ कुछ दाग अच्छे लगते है या वक्तव्यामागंही वेगळा अर्थ आहे का, अशाही चर्चा यानिमित्तानं सुरू झाल्या आहेत.
वाढदिवसाच्या पूर्वीच अमृता यांनी एका हिंदी कवितेद्वारे राज्यसरकार आणि मुख्यमंत्र्यांवर टीका केली होती. त्यापूर्वीही अमृता यांच्या अनेक पोस्टवरून चर्चा आणि वादही झाले आहेत. आता त्यांची ही पोस्टही अशीच चर्चेच राहणार हे नक्की..
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.